Welcome to Sports Vishwa

Sunday, November 25, 2018

आज आम्ही ऑस्ट्रेलियापेक्षा चांगले होतोत - कोहली

ऑस्ट्रेलिया विरुध्द तिसर्‍या आणि निर्णयाक टि-20 सामन्यात शानदार खेळ करुन मालिका वाचविणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले की आज आम्ही ऑस्ट्र्ेलियापेक्षा चांगले होतोत.
कर्णधार विराट कोहली (नाबाद 61) आणि शिखर धवन (41) यांच्या दमदार फलंदाजलच्या जोरावर भारताने सिडनी क्रिकेट मैदानावर रविवारी खेळण्यात आलेल्या तिसर्‍या आणि आणि निर्णयाक टि-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून पराभूत करुन मालिका 1-1 ने  बरोबरीत आणली.
कोहलीने सामन्यानंतर म्हटले की ज्यावेळी दोघांनी (रोहित शर्मा आणि शिखर धवन) ने आमच्यासाठी काम सोपे केल्याने  गोष्टी खूप सोप्या झाल्या होत्या. आम्ही विचार केला होता की जुन्या चेंडूसह खेळपट्टी मंद होईल परंतु क्रिकेटमध्ये असेच होत असते.
त्याने म्हटले की आपण कधी गती गमवून बसतो आणि परत त्याला मिळवतोत. शेवटी कार्तिकने चांगली फलंदाजी केली. मॅम्सवेल आयिा जम्पा दोघांनीही उत्कृष्ट गोलंदाजी केली. एकूण पाहता क्षमतांच्या जोरावर आम्ही आज ऑस्ट्रेलिया पेक्षा चांगले होतोत.
त्यांने म्हटले की ज्यावेळी आमचे सलामीचे फलंदाज आपल्या लयमध्ये येतात त्यावेळी त्यांना थांबविणे मुश्किल होते आहे. मी तिसर्‍या क्रमांकावर  संघाला लक्ष्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी आलो होतो. मला वाटते की हे 180 चा विकेट असेल. दोनीही संघ कसे खेळले हे बरोबरीच्या मालिकेतून दिसून येते.

गांगुली मितालीला बाहेर ठेवल्याने आश्‍चर्यचकित नाही

माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीने सांगितले की महिला टी-20 विश्‍वचषकात इंग्लंडविरूद्ध उपांत्य सामन्यात  मिताली राजला समाविष्ट न करण्याच्या निर्णयाने तो आश्‍चर्यचकित नाही.
सतत दोन अर्धशतक बनऊनही मितालीला ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळलेला लीग सामना आणि नंतर इंग्लंडविरूद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्याने बाहेर बसवले गेले आणि या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
गांगुलीने येथे टॉलीगंज क्लबमध्ये सांगितले नाही. संघाचे नेतृत्व केल्यानंतर मला बाहेर बसावे लागले. जेव्हा मी मितालीला बेंचवर बसताना पाहिले तर मी सांगितले ’ग्रुपमध्ये तुमचे स्वागत आहे.’
गांगुलीने ग्रेग चॅपलच्यावेळी स्वत:चे उदाहरण देताना सांगितले कर्णधाराला बाहेर बसवण्यासाठी सांगितले जाते, तर तुम्ही असेच करावे. मी पाकिस्तान दौर्‍यावर फैसलाबादमध्ये असे केले होते.
त्यांनी सांगितले जेव्हा मी एकदिवसीय सामन्यात सर्वश्रेष्ठ लयात होतो तेव्हा मी 15 महिन्यापर्यंत एकदिवसीय सामना खेळला नव्हता. आयुष्यात असे होत असते.
त्यांनी सांगितले की मितालीसाठी हा जगााचा शेवट नाही.
माजी कर्णधाराने सांगितले तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही सर्वात चांगले आहात कारण तुम्ही काही केले आणिनंतर एक संधी आहे. यामुळे मितालीला बेंचवर बसण्यासाठी सांगितल्याने मी निराश नाही.
गांगुलीने महेंद्र सिंह धोनीविषयी विचारले गेले जे मागील काही वेळेपासून चांगल्या लयात नाही आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेल्या सध्याचा भारतीय टी-20 आणि एकदिवसीय संघ सहभाग नाही.
माजी कर्णधाराने सांगितले तो (धोनी) एक चॅम्पियन आहे. टी-20 विश्‍वचषक जिंकल्यानंतर मागील 12-13 वर्ष त्याच्यासाठी चांगले राहिले. फक्त त्यांना चांगले प्रदर्शन करायचे आहे.

महिला हॉकी : नेदरलँड सातव्यांदा चॅम्मियंस ट्रॉफीचा विजयता

नेदरलँडच्या महिला हॉकी संंघाने रविवारी ऑस्ट्र्ेलियाला एकतरफा अंतिम सामन्यात 5-1 ने पराभूत करुन सातव्यांदा ट्रॉफीचा कप जिंकल
नेदरलँडने अंतिम सामन्यात दमदार सुरुवात केली आणि शान डे वार्डने संघासाठी पहिला गोल केला. यानंतर काही मिनिटानंतर अ‍ॅवा डे गोएडेने नेदनलँडची आघाडी दुप्पट केली.
तिस-या क्वॉटर्रमध्ये ऑस्ट्र्ेलियाने वापसी करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाने पेनाल्टी कॉर्नर मिळवली आणि मॅडी फिटजपॅट्रिकने गोल करुन गोलचे अंतर कमी केले.
ऑस्ट्रेलियाच्या या गोलमुळे नेदरलँडच्या आत्मविश्‍वासावर काही विशेष परिणाम पडला नाही लॉरेन स्टॅमने तिसर्‍या क्वार्टरमध्ये गोल करुन नेदरलॅेडीा 3-1 ने आघाडी मिळवून दिली. चौथ्या र्क्वाटरमयये नेदरलँडसाठी मॅक्सिम केरस्टोल्टने चौथा आणि मारिया वेरस्कूरने पाचवा गोल केला.

मेरी कॉम महिला मुक्केबाजी चॅम्पियनशिपची सर्वश्रेष्ठ मुक्केबाज

भारताची दिग्गज महिला मुक्केबाज एम.सी.मेरी कॉमला येथे झालेल्या 10 व्या आईबा महिला विश्‍व मुक्केबाजी चॅम्पियनशिपची सर्वश्रेष्ठ मुक्केबाज म्हणून घोषीत केले गेले.
आईबा पॅनलने 35 वर्षीय मेरी कॉमला चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार्‍या स्पर्धकांमध्ये सर्वश्रेष्ठ मुक्केबाज म्हणून निवडले. मेरी कॉमने शनिवारी चॅम्पियनशिपमध्ये सहाव्यांदा विश्‍व चॅम्पियनशिपचा कप जिंकून इतिहास रचला. तिने 2006 मध्ये येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता.
मेरी कॉमने रविवारी पत्रकार परिषदेत म्हटले की यावर्षी काही देशाच्या मुक्केबाजानी यामध्ये भाग घेतला. याला अजूनही ऑलम्पिकमध्ये सामिल केले गेले नाही. तरीही आम्ही आता पर्यंत चार सुवर्णसह आठ पदक जिंकले आहे. यावेळी येथे आमचे प्रदर्शन खूप चांगले राहिले. यामध्ये आम्ही एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत. 2006 पेक्षा या वर्षी या स्पर्धेचे आयोजन खूप चांगले राहिले.
हे पदक मागील पदकापेक्षा किती वेगळे आहे असा प्रश्‍न विचारला असता मेरीने म्हटले की हे माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण येथे मी आपल्या घरगुती दर्शका समोर होते आणि वेगळ्याच किलोग्रॅममध्ये होते. मी मागील पदक 2010 मध्ये जिंकले होते. मी आपल्या घरगुती दर्शका समोर सतत दबावामध्ये होते.

जिबरान खान इक्वेस्ट्रियन प्रीमियर लीग-2018 चा विजयता

एम्बेसी इंटरनॅशनल राइडिंग स्कूल (ईआयआरएस) चा जिबरान खानने येथे रविवारी झालेल्या इक्वेस्ट्रियन प्रीमियर लीग (ईपीएल) च्या नवव्या संस्करणाचा कप जिंकला.
ही स्पर्धा तीन वर्गामध्ये होती. बालक (80 सेंटीमीटर), ज्युनियर 100 सेंटीमीटर आणि ओपन 120 सेंटीमीटर. जिबरानने आपेन वर्गामध्ये आपला कप जिंकला.
बालक वर्गात शशांक वर्मा (ईआयआरए) आणि ज्युनिअर वर्गात तियाशा वाथुल (सीईओ) ने विजय मिळविला. स्पर्धेतील अंतिम सामन्यात फवाद मिर्झा, आशीष मलिक, जितेंद्र सिंह आणि राकेश कुमार सारख्या शीर्ष भारतीय घोडस्वारांसह प्रशिक्षक रोडोल्फ स्केरेरही उपस्थित होता.
जकार्तामध्ये झालेल्या आशियाई खेळात दोन रौप्य पदक जिंकणारा भारतीय इक्वेस्ट्रियन टिम आणि प्रशिक्षकाला सन्मानीत केले गेले. यावेळी मिर्झाने म्हटले की ईपीएलने एक घोडस्वारीच्या रुपामध्ये माझ्या क्षमतांना प्रकाशात आणले आहे.यामुळे माझे कौशल अधिक चांगले झाले आहे आणि माझ्यामध्ये आत्मविश्‍वास आला. ज्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खूप फायदा मिळाला.

बॅडमिंटन- समीरने दुसर्‍यांदा सैयद मोदी चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावले

सध्याचा चॅम्पियन भारताचे मुख्य पुरुष बॅडमिंटन खेळाडू समीर वर्माने आज (रविवार) येथे चांगले प्रदर्शन करून सतत दूसर्‍यांदा सैयद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले.
समीरने गतवर्षी बी साई प्रणीतला हरऊन हे विजेतेपद जिंकले होते आणि आता त्याने यावर्षी हे विजेतेपद कायक ठेवले आहे.
तीसरी सीड समीरने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामनत सहावी चीनच्या लु गुआंग्झुला तीन फेरीपर्यंत चाललेल्या कठोर आणि संघर्षपूर्ण सामन्यात 16-21, 21-19, 21-14 ने मात देऊन विजेतेपद जिंकले.
 समीरने एक तास 10 मिनीटात हा सामना जिंकला.  वर्ल्ड नंबर-16 समीरचा वर्ल्ड नंबर-36 गुआंग्झुविरूद्ध हा पहिला विजय आहे.
या विजयासह त्याने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गुआंग्झुकडून मिळालेल्या पराभवाचा बदला चुकता केला. त्याने आता गुआंग्झुविरूद्ध आपले करियर रिकॉर्ड 1-1 चे केले.
समीर पहिल्या फेरीत थोडे नरम दिसली आणि तो पहिली फेरी 16-21 ने पराभूत झाला. यानंतर त्याने दुसर्‍या फेरीत जोरदार पुनरागमन केले आणि 14-11 ची आघाडी बनल्यानंतर त्याने 21-19 ने फेरी जिंकली.
तीसरा आणि निर्णायक फेरीत दोन्ही खेळाडू चांगल्या लयात दिसला. समीर या फेरीत एकेकाळी 7-3 ने आघाडीवर होते. यानंतर चीनच्या खेळाडुने 7-7 ची बरोबरी प्राप्त केल्यानंतर 10-7 ची आघाडी बनवली.
नंतर समीरने पुनरागन केले आणि अगोदर तर 10-10 ची बरोबरी प्राप्त केली आणि त्याने 16-12 ची चांगली आघाडी बनवली. चीनची खेळाडू यानंतर फेरीत मागे असताना आणि समीरने 19-14 ची आघाडी बनवल्यानंतर 21-14 ने फेरी आणि सामना जिंकला.

दुबई कसोटी- पाकिस्तानने 5 बाद 418 धावा बनऊन डाव घोषित

हेरिस सोहेल (147) आणि बाबर आजमच्या (नाबाद 127) शतकाच्या मदतीने पाकिस्तानने येथे दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरूद्ध खेळले जाणार्‍या दुसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी आज (रविवार) पाच गडी बाद 418 धावा बनऊन आपला पहिला डाव घोषित केला.
न्यूझीलंडने याच्या उत्तरात दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत विना एखादे नुकसानीचे 24 धावा बनवल्या. तो सध्या पाकिस्तानच्या स्कोरने 394 धावांनी मागे आहे जेव्हा की त्याचे पूर्ण 10 गडी बाकी आहेत.
स्टंप्सच्यावेळी विजय रावल 31 चेंडूत तीन चौकारच्या मदतीने 17 धावा आणि टॉम लाथम 23 चेंडूवर एक चौकारच्या आधारे पाच धावा बनऊन नाबाद परतले.
यापूर्वी पाकिस्तानने आपला कालचा स्कोर चार गडी बाद 221 धावांनी पुढे खेळणे सुरू केले. सोहेलने 81 आणि बाबर आजमने आपल्या डावाला 14 धावांनी पुढे वाढवले.
सोहेल आणि आजमने सांभाळून खेळताना आपापले शतक पूर्ण केले. सोहेलचे हे दुसरे जेव्हा की आजमचे हे पहिले शतक आहे. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या गडीसाठी 186 धावा जोडल्या.
पाकिस्तानने आपला पाचवा गडी 360 च्या स्कोरवर सोहेलच्या रूपात गमावले. त्याने 421 चेंडुच्या मॅरेथॉन खेळीत 13 चौकार मारले.
आजमने कर्णधार सरफराज अहमद (नाबाद 30) सोबत सहाव्या गडीसाठी 58 धावांची भागीदारी केली. आजमने 263 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकार मारले. सरफराजने 45 चेंडुत तीन चौकार लावले.
त्याच्या व्यतिरिक्त अजहर अलीने 81, असद शफीकने 12 आणि इमाल उल हक तसेच मोहम्मद हफीजने नऊ-नऊ धावा बनवल्या.
न्यूझीलंडकडून कोलिन डी ग्रँडहोमला दोन आणि पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करून सामना जिंकणारा एजाज पटेल आणि ट्रेंट बोल्टने एक-एक गडी बाद केला.

प्रो कबड्डी लीग : स्टीलर्सचा दिल्लीवर 34-27 ने विजय

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सीझनसाठी एक महत्वाच्या सामन्यात रविवारी हरियाणा स्टिलर्सने शानदार प्रदर्शन करत दबंग दिल्लीला 34-27 ने पराभूत केले.
झोन -एच्या या सामन्यात हरियाणासाठी रेडच्या माध्यामातून सर्वाधिक गुण विकास कंडोला (10) ने मिळविले तर डिफेसच्या माध्यमातून सर्वाधिक गुण सचिन सिंगडे (4) ने मिळविले.
दिल्लीकडून रेडर नवीन कुमारने 10 गुणाचे योगदान दिले तर डिफेंडर रविंदर पहलने पाच गुणाचे योगदान दिले.
श्री शिव छत्रपती स्पोटर्स कॉम्पलेक्समध्ये झालेल्या सामन्याची सुरुवात  दोनीही संघामघ्ये जोरदार संघर्षाने झाली. सामन्याच्या सुरुवातीच्या 15 मिनिटानंद स्कोर 9-9 ने बरोबरीत राहिला.
यानंतर हरियाणाच्या संघाने दमदार प्रदर्शन करत स्कोर 11-9 केला आणि पूर्ण सामन्यात परत एकदा पकड निर्माण केली. दिल्लीने वापसी करण्याचा प्रयत्न केला आणि सामन्यातील अंतिम क्षणात बेहतर प्रदर्शन केले परत पराभव टाळू शकले नाहीत.

मिताली मामल्यावर सीओएने स्पष्टीकरण मागितले

महिला टी-20 विश्‍वचषकात इंग्लंडविरूद्ध भारताच्या उपांत्य सामन्यात मिताली राजला संघात समाविष्ट न केल्यामुळे उठलेल्या वादाने मोठे रूप घेतले.
वेबसाइट ’ईएसपीएन’ च्या वृत्तानुसार या वाढलेल्या वादामुळे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या (बीसीसीआय) प्रशासकांच्या समितीने (सीओए) स्पर्धेत मितालीचे फिटनेसची माहिती मागितली आहे. उद्या सोमवारी संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पवार आणि व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य उद्या सोमवारी सीओए आणि जोहरी यांची भेट घेऊन टी-20 विश्‍वचषकात भारतीय संघाच्या प्रदर्शनाचा  रिपोर्टही सोपवेल.
सीओएने उपांत्य सामन्यापूर्वी झालेल्या निवड समितीच्या बैठकीची माहिती मीडियामध्ये लीक झाल्यावर चिंताही वर्तवली आणि या मामल्यात बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीसहित मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
उल्लेखनीय आहे की इंग्लंडविरूद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्यात संघाची सर्वात अनुभवी फलंदाज मितालीला बेंचवर बसवण्यात आले आणि या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे मितालीला उपांत्य सामन्यात समाविष्ट न करण्याचे वाद निर्माण झाला आणि त्यानो आता मोठे रूप घेतले.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे मिताली बाहेर होती परंतु त्यापूर्वी खेळलेल्या दोन सामन्यात त्याने सतत अर्धशतकीय खेळी खेळली होती. उपांत्य सामन्याने एक दिवसापूर्वी त्यांना फिट घोषित करण्यात आले होते. तरी देखील याच्या व्यवस्थापनाने त्यांना बेंंचवर बसून ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय प्राप्त करणार्‍या अंतिम एकादशला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाविषयी प्रतिक्रिया देताना तृप्तीने सांगितले एक व्यवस्थापक म्हणून मी बैठक बोलवली. कर्णधार आणि निवडकर्ताने खेळपट्टीविषयी चर्चा केली आणि प्रशिक्षकाने हे दर्शवले की ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय प्राप्त करणार्‍या अंतिम एकादशला उपांत्य सामन्यासाठी कायम ठेवायला पाहिजे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या टी-20मध्ये ॠषभ पंतच्या नावे नकोसा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या टी-20मध्ये भारताचा 6 विकेटनं शानदार विजय झाला. कृणाल पांड्या आणि विराट कोहली भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. कृणाल पांड्यानं 4 ओव्हरमध्ये 36 रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या 4 बॅटसमनना आऊट केलं. तर कर्णधार विराट कोहलीनं 41 बॉलमध्ये 61 रनची खेळी केली. यामध्ये 4 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता.
भारतानं या मॅचमध्ये विजय मिळवला असला तरी विकेट कीपर ॠषभ पंतच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. या मॅचमध्ये ॠषभ पंत पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. अ‍ॅन्ड्र्यू टायच्या बॉलिंगवर विकेट कीपिर अ‍ॅलेक्स कारेनं पंतचा कॅच पकडला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलला आऊट होणारा ॠषभ पंत हा पहिलाच भारताचा विकेट कीपर आहे.
ॠषभ पंतसाठी खराब सीरिज
ॠषभ पंत पहिल्यांदाच भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला आहे. बॅटसमन म्हणून पंतसाठी ही टी-20 सीरिज खराब गेली. ॠषभ पंतनं पहिल्या टी-20मध्ये बेजबाबदार शॉट खेळून आऊट झाला. असा शॉट मारल्यामुळे पंतवर टीकाही झाली. या मॅचमध्ये भारताचा 4 रननं पराभव झाला. ॠषभ पंतनं तसा शॉट खेळला नसता तर त्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला असता. पहिल्या टी-20मध्ये पंतनं 20 रन केले होते. दुसरी टी-20 मॅच पावसामुळे रद्द झाली होती. तर तिसर्‍या मॅचमध्ये पंत शून्य रनवर आऊट झाला.
ॠषभ पंतची आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्द
ॠषभ पंतची आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्द अजूनही म्हणावी तशी यशस्वी राहिलेली नाही. आत्तापर्यंत खेळलेल्या 10 टी-20 मॅचमध्ये पंतनं 19.62ची सरासरी आणि 118.05 च्या स्ट्राईक रेटनं 157 रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 58 रन हा पंतचा सर्वाधिक स्कोअर आहे. 11 नोव्हेंबरला चेन्नईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-20मध्ये पंतनं हा स्कोअर केला होता. ॠषभ पंतच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक अर्धशतक आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून ॠषभ पंतनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. टेस्ट क्रिकेटमधली पहिलीच रन पंतनं सिक्स मारून केली होती. तर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये पंतनं खणखणीत शतक ठोकलं होतं. 5 टेस्ट मॅचमध्ये पंतनं 43.25 च्या सरासरीनं 346 रन केले आहेत. यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 114 हा पंतचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर आहे.

फिरकीपटू क्रुणाल पांड्याच्या या चेंडूने बदलला संपूर्ण सामना

सिडनीमध्ये झालेला तिसरा टी20 सामना भारताने एकहाती जिंकला. यात जेवढं श्रेय कर्णधार विराट कोहलीचं आहे, तेवढंच किंबहुना त्याहून जास्त श्रेय फिरकीपटू क्रुणाल पांड्याचं आहे. मौक्याच्याक्षणी क्रुणालने 36 धावा देत 4 गडी बाद करत ऑॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 164 धावांवर रोखले. त्याच्या या कामगिरीमुळे ऑॅस्ट्रेलियाच्या मातीवर सर्वात यशस्वी फिरकीपटूंमध्ये क्रुणाल पांड्याचं नाव अग्रणी आहे.
सिडनी येथे खेळण्यात आलेल्या ऑॅस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने विजय मिळवला. भारताच्या या विजयामुळे टी20 मालिका अनिर्णित राहिली. पहिला सामना ऑॅस्ट्रेलियाने जिंकला होता. तर पावसामुळे दुसरा सामना रद्द करण्यात आला होता. मालिका अनिर्णित राखण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकणं अपिरहार्य होतं. त्याचप्रमाणे 6 गडी राखून भारताने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. ऑॅस्ट्रेलियाच्या टिवटर हँडलवरून त्याच्या या चार विकेटस संक्षिप्त स्वरूपात दाखवण्यात आल्या.
विराटने सामन्यात नाबाद 62 धावांची खेळी खेळली. त्याला साथ दिली ती दिनेश कार्तिकने. ऑॅस्ट्रेलियाने दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी धडाकेबाज सुरूवात केली. त्यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र शिखर धवन 41 (22) पाठोपात रोहित शर्मा 23 (16) बाद झाला. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी धावांचा फलक हलता ठेवायचा प्रयत्न केला.
मात्र विराटला केएल राहुलचा फार साथ मिळाली नाही. 14 (20) धावा करत राहुल तंबूत परतला. त्याच्यानंतर आलेल्या ॠषभ पंतने तर सपशेल निराशा केली. एकही धावा न करता तो शुन्यावर बाद झाला. यानंतर भारत हा सामना जिंकतो की नाही असे वाटत असताना दिनेश कार्तिक आणि विराटने काही सुंदर चौकार आणि षटकार लगावले. अखेर कर्णधार विराट कोहलीने सलग 2 चौकार लगावत सामना भारताच्या नावावर केला.
फिरकीपटू कृणाल पांड्याने कांगारु संघाचे महत्त्वाचे 4 गडी बाद करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कुलदीप यादवने ऑॅस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला बाद केले. तर कृणालनेही 4 गडी बाद करत ऑॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 164 धावांमध्ये रोखले.
अ‍ॅरॉन फिंच आणि डी शॉर्ट या सलामवीरांनी सुरुवातीला केलेल्या फटकेबाजीमुळे ऑॅस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली. फिंचने 28 धावांची खेळी केली तर शॉर्टने 33 धावा केल्या. पण त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज एकामागोमाग बाद झाल्याने ऑॅस्ट्रिलियाचा संघ संकटात सापडला होता. पण पुन्हा अ‍ॅलेक्स करे आणि स्टोनिस यांनी अनुक्रमे 27 आणि 25 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑॅस्ट्रेलियन संघ भारतासमोर 165 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य ठेवू शकला.

विराट-रोहित नाही तर शिखर 2018 मध्ये सर्वाधिक टी-20 रन करणारा खेळाडू

ऑॅस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या टी-20मध्ये भारताचा 6 विकेटनं विजय झाला. याचबरोबर भारतानं 3 टी-20 मॅचची सीरिज बरोबरीत सोडवली. पहिल्या टी-20 मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर दुसरी टी-20 मॅच पावसामुळे रद्द झाली. यामुळे या मॅचमध्ये जिंकून सीरिज वाचवण्याचं आव्हान भारतापुढे होतं. विराट कोहलीच्या टीमनं हे आव्हान लिलया पेललं. 2018 या वर्षातली भारताची ही शेवटची टी-20 मॅच होती. टी-20 क्रिकेटमधला या वर्षाचा शेवट भारतानं गोड केला.
शिखर धवनच्या सर्वाधिक रन
2018 या वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणार्‍या खेळाडूंमध्ये शिखर धवनचा पहिला क्रमांक लागतो. शिखर धवननं 18 मॅचच्या 17 इनिंगमध्ये 40.52 ची सरासरी आणि 147.22 च्या स्ट्राईक रेटनं 689 रन केले. यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. 2018 मध्ये सर्वाधिक रन करणार्‍या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचा दुसरा क्रमांक लागतो. रोहितनं यावर्षी 19 मॅचच्या 18 इनिंगमध्ये 36.87 ची सरासरी आणि 147.50च्या स्ट्राईक रेटनं 590 रन केले. रोहितनं यावर्षी 2 शतकं आणि 3 अर्धशतकंही केली.
शिखर धवन आणि रोहितनंतर या यादीमध्ये पाकिस्तानच्या फकर झमान आणि बाबर आझमचा नंबर लागतो. फकर झमाननं 17 मॅचमध्ये 576 आणि बाबर आझमनं 12 मॅचमध्ये 563 रन केले.
टी-20मध्ये सर्वाधिक रन करणार्‍या खेळाडूंच्या यादीत लोकेश राहुल 15व्या क्रमांकावर आहे. राहुलनं यावर्षी 13 मॅचच्या 11 इनिंगमध्ये 324 रन केले.
2018 साली वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली या यादीमध्ये 31 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विराटच्या पुढे भारताचे मनिष पांडे आणि सुरेश रैना आहेत. मनिष पांडेनं 13 मॅचच्या 11 इनिंगमध्ये 299 रन केले, तर सुरेश रैनानं 13 मॅच आणि 11 इनिंगमध्ये 298 रन केले. 2018मध्ये सर्वाधिक रन करणार्‍या खेळाडूंच्या यादीत मनिष पांडे 16व्या आणि सुरेश रैना 17व्या क्रमांकवर आहे.
विराट कोहलीनं 2018 मध्ये 10 टी-20 मॅचच्या 9 इनिंगमध्ये 30.14 ची सरासरी आणि 121.96 च्या स्ट्राईक रेटनं 211 रन केले. यावर्षी विराट कोहलीला टी-20 मॅचमध्ये एकच अर्धशतक करता आलं. ऑॅस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-20मध्ये विराटनं 41 बॉलमध्ये 61 रनची खेळी केली.

आयएसएल-5 - दिल्लीशी बंगळुरचा सामना, सर्वांची नजर छेत्रीवर

दिल्ली डायनामोजविरूद्ध उद्या सोमवारी येथे कांतिरावा स्टेडियममध्ये होणारा सामना बंगळुरूचा कर्णधार सुनील छेत्रीसाठी विशेष असेल कारण क्लबसाठी हा त्याचा 150वा सामना असेल.
छेत्री वर्षापासून बंगळुरू एफसीचा चेहरा आहे. या क्लबसाठी त्यांनी अनेक कारनामे केले आणि त्याच्या नेतृत्वातच क्लबने गतवर्षी पहिल्यांदा आयएसएलमध्ये खेळताना फायनलमध्ये जागा बनवली होती. फायनलमध्ये त्याला चेन्नइयन एफसीविरूद्ध पराभव मिळाला होता.
बंगळुरू सध्या 10 संघाच्या तालिकेत दुसर्‍या स्थानावर आहे. दुसरीकडे, दिल्लीचा संघ अंतिम स्थानावर आहे. बंगळुरूचा संघ हा सामना जिंकून पहिल्या स्थानावर पोहचू इच्छितो तर दिल्लीचा संघही स्थान परिवर्तन करू इच्छितो.
बंगळुरू एफसी या सत्राचा एकमात्र असा संघ आहे, जो आतापर्यंत अजय आहे. या संघाने सहा सामने खेळले आहे. या संघाने आपल्या अंतिम सामन्यात एफसी गोवाला 2-1 ने हरवले होते आणि तो देखील 10 खेळांडुसोबत खेळताना. त्या सामन्यात  डिमास डेल्गाडोला लाल कार्ड मिळाला होता आणि फळस्वरूप ते दिल्लीविरूद्ध खेळु शकला नाही.
दुखापतीमुळे स्ट्राइकर मीकू आणि एरिक पाटार्लू गोवाविरूद्ध खेळु शकला नव्हता. पाटार्लूने पायाच्या अंगठ्याची सर्जरी केली आणि तो इतर काही सामन्यातही खेळु शकला नाही. मीकूचे पुनरागमन होऊ शकते परंतु सर्वकाही त्याची फिटनेस कसोटीवर अवलंबून राहील.
मीकू जर फिनेटस टेस्टमध्ये अपयशी झाला तर मग चेंचो गाइलस्टीनला नंतर संधी मिळेल. चेंचोने गोवाविरूद्ध पदार्पण केले होते. तो छेत्रीसोबत आक्रमण फळीचे नेतृत्व संभाळेल. छेत्रीने या सत्रात आतापर्यंत पाच गोल केले आहे.
दुसरीकडे दिल्लीच्या संघाची आक्रमण फळी आतापर्यंत कमजोर आहे. या संघाने आठ सामन्यात आतापर्यंत फक्त सात गोल केले आहे. या संघाने अनेक चांगली संधी बनवली परंतु त्याला गोलमध्ये बदलण्यात अपयशी राहिले.

हॉकी- ओडिसा विश्‍वचषकात या 6 उभरून दिग्गजांवर सर्वांची नजर

ओडिसा हॉकी विश्‍वचषक स्पर्धेत विभिन्न देशाच्या संघाचे अनेक चांगले आणि लोकप्रिय खेळाडू सहभाग घेत आहे परंतु यात आगामी पीढीचे अनेक उभरते दिग्गज आहेत.
विश्‍वचषक स्पर्धेत बहुतांश हॉकी चाहत्यांची नजर सहा अशा तरूण खेळांडूवर राहील, जे विश्‍वचषकाद्वारे जागतिक रूपाने आपल्या प्रदर्शनाने सर्वांवर छाप सोडणार आहे.
वर्ल्ड नम्बर-5 भारताचा 19 वर्षीय दिलप्रीत सिंह त्यापैकी एक खेळाडू आहे. गतवर्षी मलेशियामध्ये आयोजित झालेले अंडर-21 सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत दिलप्रीतने सहा सामन्यात नऊ गोल करून आपल्या क्षमतेचा परिचय दिला होता.
या प्रदर्शनने भारताचे राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह खुप प्रभावित झाले आणि त्यांनी दिलप्रीतला सीनियर संघात समाविष्ट केले. आता तो विश्‍वचषकात सर्वात तरूण खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. दिलप्रीतच्या संघात समाविष्ट होणे हरेंद्रचे तरूण पिढीत दर्शवलेल्या विश्‍वासाचे उदाहरण आहे.
याच्या व्यतिरिक्त यात वर्ल्ड नम्बर-1 ऑस्ट्रेलिया संघाचे 20 वर्षीय जेक हार्वीचे नावही समाविष्ट आहे. तीन वेळेचे ऑलिम्पियन गोर्डोन पियर्सचे नातु हार्वीच्या रक्तात हॉकी धावते.
गतवर्षी झालेल्या ओडिसा हॉकी विश्‍वचषकात ऑस्ट्रेलियाच्या डिफेंसला मजबूत करण्यात हार्वीने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती आणि याच्या बळावर संघाने विजेतेपद प्राप्त केले होते. आपल्या आतापर्यंतच्या करियरमध्ये हार्वी 39 अंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. ऑस्ट्रेलियाचे ध्येय सतत तिसर्‍यांदा विजेतेपद प्राप्त करायचे आहे आणि अशात हार्वी पूर्णपणे या ध्येयासाठी प्रतिबद्ध आहे.
वर्ल्ड नम्बर-2 अर्जेंटीनाचा 21 वर्षीय माइको कासेलाही कोणापेक्षा कमी नाही. अंतरराष्ट्रीय स्तरावर 35 सामने खेळलेले कासेला अर्जेंटीनाच्या राष्ट्रीय संघात समाविष्ट सर्वात कमी वयाच्या खेळाडू आहे.
लखनौमध्ये 2016 मध्ये झालेल्या अंडर-21 जूनियर विश्‍वचषक स्पर्धेत तो चांगले प्रदर्शन करणारा खेळाडू राहिला. या प्रदर्शनाच्या बळावर त्याने राष्ट्रीय संघात आपली विशेष जागा बनवली आहे.
नीदरलँड्सचा 20 वर्षीय खेळाडू जोरिट क्रूनकडे इतक्या कमी वयात ऑलिम्पिक खेळाचा अनुभव आहे. तो त्या वेळेत 18 वर्षाचा होता. वर्ल्ड नम्बर-4 संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅक्स काल्डासद्वारे क्रूनला रियो ऑलिम्पिक खेळासाठी निवडले जाण्याच्या निर्णयाने खुप हलचाल माजली होती.
अनेक लोकांनी याला काल्डासचे डावच्या रूपात पाहिले, परंतु क्रूनच्या प्रदर्शनाने सर्व टिकाकारांच्या तोंडावर कुलूप लावले. अंतरराष्ट्रीय स्तरावर 56 सामने खेळलेल्या क्रूनने राष्ट्रीय संघात आपली जागा बनवली आहे. तसेच सध्या त्याचे करियर खुप दिर्घ आहे.
रियो ऑलिम्पिक खेळाचा अनुभव ठेवणारे 21 वर्षीय टिम हेर्जबुर्कने वर्ल्ड-6 जर्मनीच्या राष्ट्रीय संघात आपली जागा आपल्या बळावर बनवली. लखनौमध्ये झालेल्या उत्तर प्रदेश जूनियर हॉकी विश्‍वचषकात त्याला स्पर्धेचा सर्वश्रेष्ठ खेळांडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आपल्या करियरमध्ये 54 अंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या संघाला गतवर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे दिर्घ कालवधीपर्यंत मैदानाने बाहेर रहावे लागले, परंतु आता त्याने पुनरागमन केले आहे आणि विश्‍व हॉकीमध्ये आपली छाप सोडण्यासाठी तयार आहे.
ओडिसा हॉकी विश्‍वचषकात कोणत्याही संघासाठी परेशानी उभी करण्यात स्पेनचा 22 वर्षीय खेळाडू एनरीक गोंजालेज पूर्णपणे सक्षम आहे.
वर्ल्ड नम्बर-8 स्पेनच्या राष्ट्रीय संघात तो आपली चांगली तेजी आणि हॉकी स्टिकसोबत आपले चांगल्या कौशल्यासाठी ओळखले जातात. 22 वर्ष वयात तो 73 अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या स्पर्धेचे सहा उभरते खेळांडुमध्ये समाविष्ट एनरीकने सर्वात जास्त अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्यालाही लखनौमध्ये झालेल्या जूनियर हॉकी विश्‍वचषकात सर्वश्रेष्ठ खेळाडुच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बॅडमिंटन : सात्विक -चिरागचे सय्यद मोदी चॅम्पियनशिप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतीय पुरुष युगल जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचे सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशिप कप जिंकण्याचे स्वप्न अधूरे राहिले.
भारतीय जोडी सात्विक -चिरोगला अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या फजर अल्पियान आणि मोहम्मद रियान जोडीने पराभूत केले.
पुरुष युगल वर्गातील अंतिम सामन्यात सात्विक -चिरागच्या जोडीला फजर आणि रियान जोडीने 38 मिनिटात 21-11, 22-20 ने पराभूत केले.
भारतीय जोडीने पहिला गेम गमविल्यानंतर दुसर्‍या गेममध्ये चांगली वापसी करत पहिला स्कोर 10-10 ने बरोबरीत केला आणि यानंतर 18-14 ने आघाडी घेतली. मात्र यानंतर सात्विक -चिराग या आघाडीला कायम ठेवू शकले नाही आणि इंडोनेशियाई जोडीने स्कोर 20-20 ने बरोबरीत आणला. रियान आणि फजरच्या जोडीने दोन गुण मिळविले आणि हा सामन्यासह कप जिंकला.
या पराभवाच्या कारणामुळे सात्विक आणि चिरागची जोडी मोदि चॅम्पियनशिप कप जिंकणारी पहिली भारतीय पुरुष युगल जोडी बनण्याचा इतिहास रचू शकली नाही.

ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा उत्कृष्ट सिध्द झाला - नाईट

इंग्लंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार हिटर नाईटने टि-20 विश्‍व कपमध्ये झालेल्या पराभवानंतर विरोधी संघ ऑस्ट्रेलियाची प्रशंसा केली.
येथे सर व्हिव्हियन रिचडर्स मैदानावर खेळण्यात आलेल्या आयसीसी महिला टि-20 विश्‍व कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला आठ गडी राखून पराभूत केले.
इंग्लंडची कर्णधार नाईटने सामन्यानंतर म्हटले की मला वाटते की ही खेळपट्टी उपात्या सामन्यापेक्षा चांगली होत डेनियल वॉटने आम्हांला चांगली सुरुवात करुन दिली परंतु सतत गडी बाद होत राहिल्याने संघ आपली पकड गमवून बसला. आम्हांला माहिती होते की येथे दवबिंदू असेल. त्यामुळे आम्ही बोर्डवर अधिक धावा बनवू इच्छित होतोत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाने आपले सर्व गडी गमवून 105 धावसंख्या उभारली. याला ऑस्ट्रेलिया संघाने 15.1 षटकामध्ये दोन गडी गमवून गाठले.
नाईटने म्हटले की मला आपल्या खेळाडूंवर गर्व आहे त्यानी परत एकदा संघाला अंतिम सामन्यात पोहचविले परंतु ऑस्ट्रेलिया संघाने आज आमच्यापेक्षा चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. संघामध्ये अनेक कमी अनुभवी खेळाडू असल्यामुळे आम्हांला याची किंमत मोजावी लागली.

अनाधिकारिक कसोटी : न्यूझीलँड -एचा 303 धावावर डाव घोषीत

न्यूझीलँड -ए आणि भारत-ए संघात सुरु असलेल्या अनाधिकारिक कसोटी सामन्यातील तिसर्‍या दिवशी पहिल्या डावात न्यूझीलँड संघाने आपला कर्णधार विल यंग (123) च्या शानदार शतकीय खेळनंतर सात बाद 303 धावावर आपला पहिला डाव घोषीत केला.
सेडन पार्क मैदानावर सुरु असलेल्या या कसोटी सामन्यात तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया -ए संघाने अभिमन्यू (2) आणि मयंक अग्रवाल (4) यांच्या जोरावर सात धाव केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलँड-ए संघाकडून विल यंग व्यतिरीक्त र्थियो वॉन वोएर्कोंम (54) ने अर्धशतकीय खेळी केली. या व्यतिरीक्त अन्य कोणताही फलंदाज संघासाठी महत्वाचे योगदान देऊ शकला नाही.
इंडिया - ए कडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार गडी बाद केले. या व्यतिरीक्त रजनीश गांधीने दोन आणि नवदीप सैनीने एक गडी बाद केला.

टि-20 विश्‍व कप जिंकण्याचे सर्व श्रेय गोलंदाजाना - लेनिंग

चौथ्यादा महिला टि-20 विश्‍व कप जिंकण्याचे सर्व श्रेय हे संघातील गोलंदाजाचे आहे असे मत ऑस्ट्रेलियाई महिला संघाची कर्णधार मेग लेनिंगने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाने शनिवारी रात्री उशिरा सर व्हिव्हियन रिचडर्स मैदानावर खेळण्यात आलेल्या आयसीसी महिला टि-20 विश्‍व कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला आठ गडी राखून पराभूत करुन चौथ्यांदा विश्‍व कप जिंकला.
लेनिंगने या विजयानंतर म्हटले की क्षेत्ररक्षणामध्ये आज आमचे प्रदर्शन चांगले राहिले नव्हते परंतु आमचे गोलंदाज या सामन्यासाठी आपला होमवर्क करुन आले होते. त्यांनी विरोधी संघाच्या फलंदाजाना बाद करण्यासाठी अनेक संधी निर्माण केल्या. खरेच सांगते गोलंदाजानी आपले काम चोखपणे केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाने आपले सर्व गडी गमवून 105 धावांची धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाने मात्र हे लक्ष्य दो गडी गमवून 15.1 षटकामध्ये पूर्ण केले.
लेनिंगने म्हटले की मागील दोन वर्षामध्ये आमचे प्रदर्शन चांगले राहिले नव्हते या व्यतिरीक्त मागील दोन विश्‍वकपमध्ये आमची कामगिरी चांगली राहिली नव्हती. त्यामुळे आम्ही यातून खूप काही शिकलोत आणि येथे काही गोष्टीमध्ये बदल केले. यासाठी हा विजय आमच्यासाठी खूप संतोषजनक आहे.

Saturday, November 24, 2018

दुबई कसोटी- पहिल्या दिवशी पाकिस्तानने 4 गडी बाद 207 धावा बनवल्या

अजहर अली (81) आणि हेरिस सोहेलच्या (नाबाद 81) अर्धशतकाच्या मदतीने पाकिस्तानने येथे न्यूझीलंडविरूद्ध खेळले जाणार दुसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आज (शनिवार) आपल्या पहिल्या डावात चार गडी बाद 207 धावांचा स्कोर बनवला.
पाकिस्तानने येथे दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाची खराब सुरूवात राहिली आणि त्याने 25 धावाच्या आत आपले दोन ओपनर इमाल उल हक (9) आणि मोहम्मद हफीजचे (9) गडी गमावले.
यानंतर अली आणि सोहेलने तीसर्‍या गडीसाठी 126 धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले.  अली टीमचे 151 च्या स्कोरवर बाद झाले. त्याने 187 चेंडुच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारला.
पाकिस्तानने आपला चौथा गडी 174 च्या स्कोरवर असद शफीक (12) च्या रूपात गमावले. यानंतर बाबर आजम (नाबाद 14) आणि सोहेलने आणखी दुसरा गडी बाद होऊ दिला नाही आणि दिवसाचा खेळ काढला.
सोहेलने आतापर्यंत 240 चेंडुचा सामना केला ज्यात त्याने 10 चौकार मारले. आजम 27 चेंडुवर दोन चौकार मारले. दोन्ही फलंदाज आतापर्यंत 33 धावांची अविजित भागीदारी केली आहे.
न्यूझीलंडकडून कोलिन डी ग्रंँडहोमला दो पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करून सामना जिंकणार्‍या एजाज पटेलने एक गडी बाद केला.

रामोसावर लावलेल्या डोपिंग आरोपाचे रियलकडून खंडन

स्पॅनिश क्लब रियल माद्रिदने संघाचा कर्णधार सर्जियो रामोसवर लावल्या डोपिंग आरेपांना फेटाळले आहे.
डेर स्पीगल नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने आपल्या बातमीमध्ये लिहिले की लिवरपूलच्या विरुध्द झालेल्या अंतिम सामन्यानंतर रामोसाला प्रतिबंधीत पदार्थाचे सेवन करण्यामध्ये दोषी आढळले होते.
क्लबने शुक्रवारी निवेदनात म्हटले की सर्जियो रामोसने कधीही डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केलेले नाही.
रामोसने ज्या प्रतिबंधीत पदार्थाचे सेवन केले त्याचा उपयोग यूईएफएला माहिती दिल्यानंतर केले जाऊ शकते आहे.