कोलंबो,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसर्या व अखेरच्या कसोटीत जॉनी बेअरस्टोने झंझावाती शतक केले. त्याच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर 7 विकेट गमावत 312 धावा केल्या आहेत. बेअरस्टोने 186 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 110 धावांची खेळी केली. यासह त्याने इंग्लंडसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
साहेबांची सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर बेअरस्टो आणि रुटने इंग्लंडचा डाव सावरत संघाला 300 धावांचा टप्पा गाठण्यात मोलाची भुमिका बजावली. कर्णधार जो रूटने 46, तर बेन स्टोक्सने 57 धावांची उपयुक्त खेळी केली. बेअरस्टो, रूट आणि स्टोक्स वगळता एकाही फलंदाजाला लंकन गोलंदाजांचा सामना करता आला नाही. श्रीलंकेसाठी लक्षण संदाकनने सर्वाधिक 4 गडी गारद केलेत, तर मलिंदा पुष्पकुमारने 2 आणि दिलरुवान परेराने 1 विकेट घेतला. 3 कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिले 2 सामने इंग्लंडच्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्यासाठी लंकन संघ जोरदार प्रयत्न करेल. दुसरीकडे तिसरा सामना आपल्या नावावर करत लंकेला व्हाईट वॉश देण्याच्या इराद्याने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे. हा सामना कोलंबो शहरातील सिंहलीज क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment