कोलंबो,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
बांगलादेश आणि विंडीज यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेश ’शेर’ ठरला होता, तर दुसर्या डावात ’ढेर’ झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने पहिल्या डावात मोमिनुल हकच्या शानदार 120 धावांच्या शतकी खेळीमुळे विंडीजसमोर 324 धावांचा डोंगर उभारला होता. बांगलादेशनंतर फलंदाजीस आलेला विंडीजचा संघ 246 धावांवर सर्वबाद झाला होता. यानंतर दुसर्या डावात मोठी धावसंख्या उभारून सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरलेला बांगलादेश संघाचे दुसर्या दिवसअखेर 55 धावांत 5 गडी माघारी परतले आहेत. त्यामुळे बांगलादेश संघासमोर पराभवाचे संकट उभे ठाकले आहे.
दुसर्या डावात विंडीजसाठी जोमेल वारिकन आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. देवेंद्र बिशूला 1 विकेट घेण्यात यश आले. या डावात बांगलादेशच्या पहिल्या 5 फलंदाजांपैकी एकही फलंदाज विंडीजच्या धारदार मार्याचा सामना करू शकले नाहीत. दिवसअखेर बांगलादेश संघाकडे केवळ 133 धावांची आघाडी आहे. हा सामना बांगलादेशच्या झोहुर अहमद चौधरी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येत आहे. विंडीजचा संघ या दौर्यावर बांगलादेशविरुद्ध 3 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

No comments:
Post a Comment