अॅन्टिगा,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
सलग 4 सामने जिंकून विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारलेल्या भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. कर्णधार हरमनप्रीत कौरचा एक निर्णय संघाला भारी पडला आहे. तिच्या एका निर्णयामुळे भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचू शकला नाही.
सेमीफायनलसारख्या महत्वपूर्ण सामन्यात अनुभवी मिताली राजला संघात न खेळविण्याचा निर्णय घेतला. कौरच्या निर्णयाने भारतीय क्रिकेट फॅन्स नाराज झाले आहेत. दुखापतीमुळे तिला ऑस्ट्रेलिायाविरुद्धच्या सामन्यात न खेळविण्याचा निर्णय घेतला होता. ती इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फिट असतानाही तिला खेळविले नाही. मितालीने या विश्वचषकात सलग 2 सामन्यांत 2 अर्धशतके ठोकत दोनदा सामनावीरचा किताब पटकाविला होता.
मिताली राज फॉर्मात असूनही तिला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय संघाला महागात पडला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून 19.3 षटकात 112 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला. हे आव्हान इंग्लंडने 2 गड्यांच्या मोबदल्यात 17.1 षटकात पूर्ण केले.
विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल होती हे दिसून आले, तरीही भारतीय संघ याच खेळपट्टीवर खेळताना संघर्ष करताना दिसून आला. एक अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याच्या नादात मितालीला संघाबाहेर ठेवण्यात आले.
भारतीय फंलदाजांमध्ये अनुभवाची कमतरता दिसून येत होती. एरव्ही आक्रमक खेळणारे भारतीय फलंदाज आजच्या सामन्यात खेळपट्टीवर टिकले सुधा नाहीत. सुरुवातीचे 4 फलंदाज सोडता इतर कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. एकवेळ अशी होती, की भारतीय संघाने 13.4 षटकात 2 बाद 89 धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या 28 चेंडूत भारताने 23 धावा करत 8 गडी गमावले, त्यामुळे भारताचा पराभव झाला.

No comments:
Post a Comment