Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

द. आफ्रिकेला मोठा धक्का; लुंगी एनगिडी 3 महिन्यांसाठी क्रिकेटच्या मैदानातून बाहेर

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला गुडघ्याची दुखापत झाल्याने पुढचे 3 महिने तो क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाहीये. क्रिकइन्फोच्या ?अहवालानुसार, दुखापतग्रस्त लुंगी डिसेंबरमध्ये होणारी पाकिस्तानविरूद्धची मालिका खेळू शकणार नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला होता.
22 वर्षीय लुंगी एनगिडीने दक्षिण आफ्रिकेसाठी गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 26 विकेट घेतल्या होत्या. मात्र, आता त्याला संघात परतण्यासाठी मार्चपर्यंत 2019 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मूसाजी यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यादरम्यान लुंगी जखमी झाला होता. त्याला झालेली जखम एवढी गंभीर आहे की, परत मैदानात येण्यासाठी त्याला अंदाजे 3 महिन्यापर्यंतचा वेळ लागू शकतो.

No comments:

Post a Comment