टी-10 स्पर्धेमध्ये फक्त 10 षटकांमध्ये नॉर्दन वॉरियर्स संघाने तब्बल 183 धावांचा डोंगर उभारला आहे. या खेळीत नॉर्दन वॉरियर्स फलंदाजांनी 19 षटकार ठोकले आहेत, नॉर्दन वॉरियर्स विरुद्ध पंजाब लेजंडमध्ये झालेल्या सामन्यात ही किमया साधली आहे.
नॉर्दन वॉरियर्सकडून फलंदाजीसाठी उतरलेल्या निकोल्स पुरनने 10 षटकार, 2 चौकार ठोकत 25 चेंडूत 77 धावा केल्या. तर 9 चेंडूत 6 षटकार ठोकत आंद्रे रसेलने त्याला सुरेख सोबत केली. या दोघांनी 7 षटकांमध्ये धावसंख्या 130वर नेली. त्यानंतर निकोल्स बाद झाला. मग फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पॉवेलनेही 2 षटकार आणि 2 चौकार ठोकून धावसंख्या 183वर नेली. आतापर्यंतची टी10मधली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. 184 चा लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाचा डाव मात्र 84 धावातच आटोपला. त्यामुळे 99 धावांनी नॉर्दन वॉरियर्सने हा सामना जिंकला आहे.

No comments:
Post a Comment