विराट एक उत्कृष्ट फलंदाज आहे,त्याने अनेक विक्रमही बनवले आहेत. पण कर्णधारपदाचा विचार केल्यास विराटला धोनीकडून खूप काही शिकण्याची गरज आहे असे मत पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदी याने व्यक्त केले आहे.
नुकतेच एका पाकिस्तानी न्यूज चॅनलने शाहिद आफ्रिदीची मुलाखत घेतली. त्याला या मुलाखतीत जागतिक क्रिकेटबद्दल अनेक प्रश्व विचारण्यात आले.
विराट आणि धोनीबद्दल प्रश्न विचारले असता शाहिद आफ्रिदी म्हणाला, ’ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. पण सर्वोत्कृष्ट कर्णधार होण्यासाठी कॅप्टन कूल धोनीकडून त्याला बरेच काही शिकावे लागणार आहे.त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे’. यावेळी त्याने ऑॅस्ट्रेलिया दौरा भारतासाठी महत्त्वाचा असून या मालिकेमध्ये विराटच्या कर्णधारपदाचा कस लागणार आहे असे मत त्याने व्यक्त केले आहे. 1947 पासून भारताने 11 ऑॅस्ट्रेलिया दौरे केले आहे. पण एकही कसोटी मालिका भारताला कांगारूंच्या भूमीत जिंकता आलेली नाही. जानेवारीत भारत आणि ऑॅस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तेव्हा भारत यावेळी तरी कसोटी मालिका जिंकतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments:
Post a Comment