मेरी कोमच्या जिगरबाज यशापासून प्रेरणा घेत सोनिया चहलने जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेतील 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उत्तर कोरियाच्या सॉन वा जो हिला विजयाचा पंच देत बाजी मारली. तिसर्या फेरीच्यावेळी सोनिया जास्त तयारीने आली. तिने लढतीत बरोबरीची स्थिती राहणार असे वाटत असतानाच काही अचूक ताकदवान पंच दिले. निर्णायक फेरीत जास्त आक्रमक खेळलो, तर यश मिळवण्याची संधी आहे. त्याचवेळी दोन्ही हाताने ठोसे देणे आवश्यक आहे, हे जाणून होते. त्यानुसारच खेळ करीत विजय मिळवला, असे तिने सांगितले.
मेरी कोमच्या यशामुळे खाशाबा जाधव कुस्ती संकुलातील या स्पर्धेस चांगली गर्दी झाली होती. सोनियाने चाहत्यांच्या उत्साही प्रतिसादास योग्य आक्रमक खेळाने साद देत आशियाई क्रीडा उपविजेतीविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. चार पंचांनी सोनियाच्या बाजूने 30-27 असा कौल दिला, तर एकाच पंचांनी 29-28 अशी चुरशीची लढत झाल्याचे मत व्यक्त केले. मेरी कोमच्या उपांत्य लढतीचा कौलही याच प्रकारचा होता. सोनियाने प्रतिस्पर्धीच्या खेळाचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता. तिची सुरुवात सावध होती, तर प्रतिस्पर्धी आक्रमक होती. या फेरीत सोनियास कमी गुण असल्याचा अंदाज तिच्या मार्गदर्शकांना आला होता. पहिल्या फेरीच्या अंतिम टप्प्यात अचूक ठोसे देत तिने आपली तयारी दाखवून दिली. अर्थातच, ब्रेकच्यावेळी तिच्या प्रतिस्पर्धीवर दडपण आले. दुसर्या फेरीत सोनियाने हेच दडपण वाढवण्याचा निकराचा प्रयत्न केला. तिने वर्चस्वही घेतले; पण कोरियन प्रतिस्पर्धीने चांगला बचाव केला. दुसर्या फेरीनंतरही निकाल काय लागेल सांगता येत नव्हते. चीनच्या डॅन डोऊविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळ करूनही केवळ पंचांनी दिलेल्या वेगवेगळ्या गुणांमुळे भारताच्या सिमरनजितचा अंतिम फेरीतील प्रवेश हुकला. परिणामी, तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या राऊंडमध्ये संधी मिळतात सिमरनजितने चांगले पंच मारले, दुसर्या राऊंडमध्ये तिने सावध सुरुवात करून चांगले पुनरामन केले होते; परंतु अंतिम क्षणी डॅनने चांगला हल्ला केला होता. तिसर्या राऊंडचा खेळ पाहता सिमरन विजयी होणार असे वाटत होते; परंतु पंचांच्या गुणांतील फरकामुळे डॅनला विजयी घोषित करण्यात आले. एवढ्या कमी वयात अंतिम फेरी गाठली यावर अजूनही विश्वास बसत नाही. निर्णायक लढतीत प्रतिस्पर्धी कोण आहे. याचा जास्त विचार करणार नाही. मी माझ्याच पद्धतीने खेळ करणार आहे. घरच्या मैदानावर खेळत आहे. चाहत्यांचे प्रोत्साहनही मोलाचे ठरत आहे. त्यात पूर्ण झोकून देऊन खेळणार आहे. अंतिम फेरीतही ते महत्त्वाचे असेल.

No comments:
Post a Comment