भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी आयसीसी महिला ऊ-20 विश्वचषकाचा उपांत्य सामना झाला. या सामन्यात भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाल्याने भारताचे विश्वचषक विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले. या महत्वाच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने अनुभवी मिताली राजला संघात न खेळवण्याचा निर्णय घेतला होता. यावर टीका करताना मितालीच्या मॅनेजरने हरमनप्रीत धूर्त आणि खोटारडी असल्याचे टवीट केले आहे.
मितालीची मॅनेजर अनीशाने टवीट करताना लिहिले की, ’भारतीय संघ राजकारणावर विश्वास ठेवते हे दुर्भाग्यपूर्ण आहे, आयर्लंडविरुद्ध मिताली राजचा अनुभव किती उपयोगी पडला होता, हे पाहुनही हरमनप्रीतने मितालीला बाहेर ठेवले. हरमनप्रीत चालाक, अपरिपक्व, खोटारडी आणि कर्णधारपदासाठी अयोग्य व्यक्ती आहे’, असे गंभीर आरोप अनीशाने हरमनप्रीतवर केले आहेत.
एका अनोळखी टवीटर अकाउंटवरुन हे टवीट करण्यात आले होते. परंतु, काही वेळाने हे टवीट डिलीट करण्यात आले होते. याबाबत अनीशाला विचारले असता, तिने स्वत: टवीट केल्याची कबुली दिली आहे. अनीशा म्हणाली, ’मला नाही माहित की काय चालू आहे, आता सामन्यांचे थेट प्रक्षेपण होत आहे. त्यामुळे कोण प्रदर्शन करते आणि कोण नाही, हे आपण बघतच आहोत. मितालीने चांगले प्रदर्शन करुनही तिच्यासोबत काय झाले हे पाहणे गरजेचे आहे, यामागे मोठे कारस्थान असून याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही तिने सांगितले.’
उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजी ढेपाळली होती. 89 धावांवर 3 बाद अशा मजबूत स्थितीत असताना पुढील 7 फलंदाज केवळ 23 धावांत बाद झाले होते. भारतीय संघ सामन्यात केवळ 112 धावाच करु शकला होता. इंग्लंडने हा सामना 8 गड्यांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

No comments:
Post a Comment