सिडनी,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताचा 4 धावांनी पराभव झाला तर दुसरा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला. या दरम्यान भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर सध्या टी-20 संघासोबत नसून ते सिडनीच्या मैदानावर कसोटी संघातील फलंदाजाचा सराव घेत आहेत. कसोटी मालिकेसाठी 6 डिसेंबरपासुन सुरू होणार आहे. त्याच्या तयारीसाठी काही खेळाडूसह बांगर सिडनीमध्ये आहेत.
बांगर पृथ्वी शॉ, हनुमा विहारीसारख्या नवख्या फलंदाजाकडून नेटमध्ये फलंदाजीचा सराव करुन घेत आहेत. बीसीसीआयच्या अधिकार्याने सांगितले, की फलंदाजी प्रशिक्षक बांगर, थ्रोडाउन विशेष तज्ज्ञ नुवान आणि लॉजिस्टिक मॅनेजर सिडनीत आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हे खेळाडू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतील. ऑस्ट्रेलिया दौर्याचा सुक्ष्म अभ्यास करण्यात सध्या बांगर व्यस्त आहेत.
मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा हे गोलंदाज काही दिवसात भारतीय संघात सामील होतील. तत्पूर्वी कसोटी संघातील खेळाडू न्यू साउथ वेल्स ग्रेड क्रिकेट येथील नेट गोलंदाजांच्या गोलंदाजीवर भारतीय खेळाडू फलंदाजीचा सराव करतील, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment