मेलबर्न,23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ॠषभ पंत ब्रिस्बेनच्या टी-20 सामन्यात चुकीचा फटका मारुन बाद झाला. त्यामुळे सामन्याच्या निकालावर परिणाम झाला. जो सामना भारत जिंकू शकत होता, त्याच सामन्यात ॠषभच्या चुकीच्या फटक्यामुळे पराभवला सामोरे जावे लागले, याबाबत कर्णधार सौरव गांगुलीने ॠषभला शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
सौरभ म्हणाला, की ॠषभ पंतला दिनेश कार्तिकची साथ देण्याची गरज होती. हा सामना भारताला जिंकायला हवा होता. ॠषभने जो फटका मारला, तो अत्यंत चुकीचा होता.
सौरभ पुढे बोलताना म्हणाला, की पंत युवा खेळाडू आहे, त्याला सिनियर खेळाडूने मार्गदर्शन करायला हवे. तो सरळ फटके मारु शकत असतानाही त्याने स्कूप शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला. ॠषभच्या फॉर्मची मला चिंता वाटत नाही, पण त्याचे शॉट सिलेक्शन पूर्णपणे चूकीचे आहे. कर्णधार कोहलीनेही सामन्यानंतर पंत बाद होणे हा सामन्याचा टर्निग पाँईट होता असे सांगितले.

No comments:
Post a Comment