ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या टी-20मध्ये भारताचा 6 विकेटनं शानदार विजय झाला. कृणाल पांड्या आणि विराट कोहली भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. कृणाल पांड्यानं 4 ओव्हरमध्ये 36 रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या 4 बॅटसमनना आऊट केलं. तर कर्णधार विराट कोहलीनं 41 बॉलमध्ये 61 रनची खेळी केली. यामध्ये 4 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता.
भारतानं या मॅचमध्ये विजय मिळवला असला तरी विकेट कीपर ॠषभ पंतच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. या मॅचमध्ये ॠषभ पंत पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. अॅन्ड्र्यू टायच्या बॉलिंगवर विकेट कीपिर अॅलेक्स कारेनं पंतचा कॅच पकडला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलला आऊट होणारा ॠषभ पंत हा पहिलाच भारताचा विकेट कीपर आहे.
ॠषभ पंतसाठी खराब सीरिज
ॠषभ पंत पहिल्यांदाच भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आला आहे. बॅटसमन म्हणून पंतसाठी ही टी-20 सीरिज खराब गेली. ॠषभ पंतनं पहिल्या टी-20मध्ये बेजबाबदार शॉट खेळून आऊट झाला. असा शॉट मारल्यामुळे पंतवर टीकाही झाली. या मॅचमध्ये भारताचा 4 रननं पराभव झाला. ॠषभ पंतनं तसा शॉट खेळला नसता तर त्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला असता. पहिल्या टी-20मध्ये पंतनं 20 रन केले होते. दुसरी टी-20 मॅच पावसामुळे रद्द झाली होती. तर तिसर्या मॅचमध्ये पंत शून्य रनवर आऊट झाला.
ॠषभ पंतची आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्द
ॠषभ पंतची आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्द अजूनही म्हणावी तशी यशस्वी राहिलेली नाही. आत्तापर्यंत खेळलेल्या 10 टी-20 मॅचमध्ये पंतनं 19.62ची सरासरी आणि 118.05 च्या स्ट्राईक रेटनं 157 रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 58 रन हा पंतचा सर्वाधिक स्कोअर आहे. 11 नोव्हेंबरला चेन्नईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-20मध्ये पंतनं हा स्कोअर केला होता. ॠषभ पंतच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक अर्धशतक आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून ॠषभ पंतनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. टेस्ट क्रिकेटमधली पहिलीच रन पंतनं सिक्स मारून केली होती. तर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये पंतनं खणखणीत शतक ठोकलं होतं. 5 टेस्ट मॅचमध्ये पंतनं 43.25 च्या सरासरीनं 346 रन केले आहेत. यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 114 हा पंतचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर आहे.

No comments:
Post a Comment