Welcome to Sports Vishwa
Showing posts with label BOXING. Show all posts
Showing posts with label BOXING. Show all posts

Sunday, November 25, 2018

मेरी कॉम महिला मुक्केबाजी चॅम्पियनशिपची सर्वश्रेष्ठ मुक्केबाज

भारताची दिग्गज महिला मुक्केबाज एम.सी.मेरी कॉमला येथे झालेल्या 10 व्या आईबा महिला विश्‍व मुक्केबाजी चॅम्पियनशिपची सर्वश्रेष्ठ मुक्केबाज म्हणून घोषीत केले गेले.
आईबा पॅनलने 35 वर्षीय मेरी कॉमला चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार्‍या स्पर्धकांमध्ये सर्वश्रेष्ठ मुक्केबाज म्हणून निवडले. मेरी कॉमने शनिवारी चॅम्पियनशिपमध्ये सहाव्यांदा विश्‍व चॅम्पियनशिपचा कप जिंकून इतिहास रचला. तिने 2006 मध्ये येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता.
मेरी कॉमने रविवारी पत्रकार परिषदेत म्हटले की यावर्षी काही देशाच्या मुक्केबाजानी यामध्ये भाग घेतला. याला अजूनही ऑलम्पिकमध्ये सामिल केले गेले नाही. तरीही आम्ही आता पर्यंत चार सुवर्णसह आठ पदक जिंकले आहे. यावेळी येथे आमचे प्रदर्शन खूप चांगले राहिले. यामध्ये आम्ही एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत. 2006 पेक्षा या वर्षी या स्पर्धेचे आयोजन खूप चांगले राहिले.
हे पदक मागील पदकापेक्षा किती वेगळे आहे असा प्रश्‍न विचारला असता मेरीने म्हटले की हे माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण येथे मी आपल्या घरगुती दर्शका समोर होते आणि वेगळ्याच किलोग्रॅममध्ये होते. मी मागील पदक 2010 मध्ये जिंकले होते. मी आपल्या घरगुती दर्शका समोर सतत दबावामध्ये होते.

Saturday, November 24, 2018

महिला विश्‍व मुक्केबाजीत सोनिया चहलला रौप्यपदक

भारतीय खेळाडू सोनिया चहलला येथे सुरु असलेल्या विश्‍व महिला मुक्केबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असून शनिवारी जर्मनीच्या गेब्रिएल वाहनेरने 57 किलोग्रॅम वजनीगटातील अंतिम सामन्यात सोनियाला पराभूत केले.
इंदिरा गांधी मैदानातील के.डी.जाधव हॉलमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सोनियाला वाहनेरने 4-1 ने पराभूत केले व सुवर्ण पदक जिंकले.
पाच जजांनी 29-28, 29-28, 28-29, 29-28, 29-28 ने निर्णय जर्मन खेळाडूच्या बाजूने दिला.

बॉक्सर मेरी कोमला सहाव्यांदा विश्‍वविजेतेपद

boxer-marie-komala-for-6-times-world-cup
पाच वेळा विश्‍वविजेतेपद जिंकणारी भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोमने आज इतिहास रचला. मेरी कोमने जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत युक्रेनच्या हॅना ओखोता हिला नमवित सहाव्यांदा विश्‍वविजेतेपद पटकावले. सर्वात जास्त गोल्ड मेडल जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही मेरी कोमने आपल्या नावावर केला. मेरी कॉमने या विजयासह एकूण सात गोल्ड मेडल जिंकले आहेत. यात सहा सुवर्ण तर एक रौप्य पदकांचा समावेश आहे.
मेरी कोमने गोल्ड मेडलचा षटकार लगावला असून तिने पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील दिग्गज खेळाडून फेलिक्स सेवॉनची बरोबरी साधली. फेलिक्सच्या नावावर सहा गोल्ड मेडल आहेत. मेरी कोमने आज जिंकलेले गोल्ड मेडल हे खास आहे. 8 वर्षानंतर मेरी कोमने सुवर्ण पदक जिंकले आहे. 2006 आणि 2000 साली तिने गोल्ड मेडल जिंकले होते. आयर्लंडची खेळाडू कॅटी टेलरसह मेरीची बरोबरी झाली होती. मेरीच्या खात्यात जागतिक स्पर्धेतील पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी सहा पदके होते. तर कॅटीच्या खात्यात पाच सुवर्ण आणि एक ब्राँझ अशी सहा पदके होती. मेरी कोमने या विजयासह कॅटीला मागे टाकले. मेरीच्या नावावर आता सहा गोल्ड मेडल झाले आहेत. आता फक्त प्रश्‍न आहे तो ती कोणते पदक जिंकणार हा. जर तिने शनिवारी होणार्‍या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले तर ती पुरुषांशीही बरोबरी करणार आहे. क्युबाचा फेलिक्स सॅव्हन याच्याशी ती सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारी खेळाडू म्हणून बरोबरी करणार आहे. सॅव्हनने तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या खात्यात सहा सुवर्ण आणि एक रौप्य आहे. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत मेरी कोमने याआधी 2002 साली अँटाल्या येथील टर्की येथे झालेल्या स्पर्धेत 45 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावले होते. त्यानंतर रशियात 2005 साली 46 किलो वजनी गटात, 2006 साली नवी दिल्लीत 46 किलो वजनी गटात, 2008 साली चीनमध्ये 46 किलो वजनी गटात, 2010 साली बारबाडोस येथे 48 किलो वजनी गटात, आणि आता नवी दिल्लीत 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे.

मेरी कोमचा ऐतिहासिक ’सुवर्ण’पंच, सहाव्यांदा विश्‍वविजेतेपदाला गवसणी

mary-koms-historic-gold-five-wicket-win-for-sixth-winner
भारताची दिग्गज बॉक्सिंग खेळाडू मेरी कोमने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत शानदार विजय मिळवत सहाव्यांदा विश्‍वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात महिलांच्या 48 किलो वजनी गटात युक्रेनच्या एच.ओखोटोचा 5-0 ने पराभव करत मेरीने सुवर्णपदकावर नाव कोरले.
जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम हा आयरीश बॉक्सर कॅटी टेलरच्या नाववर होता. मात्र मेरीने सहाव्यांदा सुवर्णपदक जिंकत तीचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या विजयानंतर मेरी म्हणाली की, आजचा विजय हा मी देशाला समर्पित केला आहे.
उपांत्य सामन्यात नॉर्थ कोरियाच्या किम ह्यांग मीला 5-0 ने पराभवाचा धक्का देत मेरीने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. मेरीने आतापर्यंत जगभरातील विविध बॉक्सिंग स्पर्धांमध्ये पदक पटकावली आहेत. 35 वर्षीय मेरीने गेल्या वर्षीच आशियायी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. त्यासोबतच गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण पदकावर तिने नाव कोरले होते.
जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमने मिळवलेली पदके
2001 यूएस (45 किलो) रौप्य पदक
2002 अँटाल्या (46 किलो) सुवर्णपदक
2005 रशिया (46 किलो) सुवर्णपदक
2006 नवी दिल्ली (46 किलो) सुवर्णपदक
2008 चीन (48 किलो) सुवर्णपदक
2010 बारबाडोस (48 किलो) सुवर्णपदक
2018 नवी दिल्ली (48 किलो) सुवर्णपदक

महिला बॉक्सर मेरी कोमला सहाव्यांदा विश्‍वविजेतेपद

भारताची महिला बॉक्सर एमसी मेरी कोम सहाव्यांदा विश्‍वविजेती ठरली आहे. नवी दिल्लीतल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिने 48 किलो वजनी गटाचे सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला.
मेरी कोमचे जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतले हे सहावे सुवर्णपदक असून, आजवरच्या इतिहासातली ती सर्वात यशस्वी बॉक्सर ठरली आहे. तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखोटाचा 5-0 असा पराभव केला.
फायनलमध्ये मेरीचा आक्रमक अवतार पहायला मिळाला. सामन्याच्या पहिल्या फेरीपासून तिने जोरदार आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या फेरीत तिने ओखोटाला हतबल केले होते. पहिल्या फेरीतल्या आक्रमणामुळे तिला आघाडी मिळाली. त्यामुळे सामन्याच्या शेवटपर्यंत ओखोटा दबावात होती. याचाच फायदा मेरीने घेतला.
मेरी कोमने याआधी 2002, 2005, 2006, 2008 आणि 2010 सालच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2001 सालच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम कांस्यपदकाची मानकरी ठरली होती.