Welcome to Sports Vishwa
Showing posts with label BATMINTON. Show all posts
Showing posts with label BATMINTON. Show all posts

Sunday, November 25, 2018

बॅडमिंटन- समीरने दुसर्‍यांदा सैयद मोदी चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावले

सध्याचा चॅम्पियन भारताचे मुख्य पुरुष बॅडमिंटन खेळाडू समीर वर्माने आज (रविवार) येथे चांगले प्रदर्शन करून सतत दूसर्‍यांदा सैयद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले.
समीरने गतवर्षी बी साई प्रणीतला हरऊन हे विजेतेपद जिंकले होते आणि आता त्याने यावर्षी हे विजेतेपद कायक ठेवले आहे.
तीसरी सीड समीरने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामनत सहावी चीनच्या लु गुआंग्झुला तीन फेरीपर्यंत चाललेल्या कठोर आणि संघर्षपूर्ण सामन्यात 16-21, 21-19, 21-14 ने मात देऊन विजेतेपद जिंकले.
 समीरने एक तास 10 मिनीटात हा सामना जिंकला.  वर्ल्ड नंबर-16 समीरचा वर्ल्ड नंबर-36 गुआंग्झुविरूद्ध हा पहिला विजय आहे.
या विजयासह त्याने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गुआंग्झुकडून मिळालेल्या पराभवाचा बदला चुकता केला. त्याने आता गुआंग्झुविरूद्ध आपले करियर रिकॉर्ड 1-1 चे केले.
समीर पहिल्या फेरीत थोडे नरम दिसली आणि तो पहिली फेरी 16-21 ने पराभूत झाला. यानंतर त्याने दुसर्‍या फेरीत जोरदार पुनरागमन केले आणि 14-11 ची आघाडी बनल्यानंतर त्याने 21-19 ने फेरी जिंकली.
तीसरा आणि निर्णायक फेरीत दोन्ही खेळाडू चांगल्या लयात दिसला. समीर या फेरीत एकेकाळी 7-3 ने आघाडीवर होते. यानंतर चीनच्या खेळाडुने 7-7 ची बरोबरी प्राप्त केल्यानंतर 10-7 ची आघाडी बनवली.
नंतर समीरने पुनरागन केले आणि अगोदर तर 10-10 ची बरोबरी प्राप्त केली आणि त्याने 16-12 ची चांगली आघाडी बनवली. चीनची खेळाडू यानंतर फेरीत मागे असताना आणि समीरने 19-14 ची आघाडी बनवल्यानंतर 21-14 ने फेरी आणि सामना जिंकला.

बॅडमिंटन : सात्विक -चिरागचे सय्यद मोदी चॅम्पियनशिप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतीय पुरुष युगल जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचे सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशिप कप जिंकण्याचे स्वप्न अधूरे राहिले.
भारतीय जोडी सात्विक -चिरोगला अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या फजर अल्पियान आणि मोहम्मद रियान जोडीने पराभूत केले.
पुरुष युगल वर्गातील अंतिम सामन्यात सात्विक -चिरागच्या जोडीला फजर आणि रियान जोडीने 38 मिनिटात 21-11, 22-20 ने पराभूत केले.
भारतीय जोडीने पहिला गेम गमविल्यानंतर दुसर्‍या गेममध्ये चांगली वापसी करत पहिला स्कोर 10-10 ने बरोबरीत केला आणि यानंतर 18-14 ने आघाडी घेतली. मात्र यानंतर सात्विक -चिराग या आघाडीला कायम ठेवू शकले नाही आणि इंडोनेशियाई जोडीने स्कोर 20-20 ने बरोबरीत आणला. रियान आणि फजरच्या जोडीने दोन गुण मिळविले आणि हा सामन्यासह कप जिंकला.
या पराभवाच्या कारणामुळे सात्विक आणि चिरागची जोडी मोदि चॅम्पियनशिप कप जिंकणारी पहिली भारतीय पुरुष युगल जोडी बनण्याचा इतिहास रचू शकली नाही.