खेळाडू ज्या वयात निवृत्त होऊन खेळापासून दूर होतात, सिंधी संघाचा फिरकी
गोलंदाज प्रवीण तांबेने त्याच वयात अबुधाबी येथे सुरू असलेल्या टी-10
लीगमध्ये नवा विक्रम केला आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्याने हॅटट्रिक
साधली आहे. त्याने आयपीएलच्या 7 व्या मोसमातही यापूर्वी कोलकाता नाइट
रायडर्सच्या संघाविरुद्ध खेळताना हॅटट्रिक घेतली होती. तांबे हा मुळचा
मुंबईचा असून तो सध्या अबुधाबी येथे सुरू असलेल्या टी-10 लीगमध्ये खेळत
आहे.
इयान मॉर्गन, केरॉन पोलार्ड, फॅबिअन अलियन या तिघांना प्रवीणने सलग 3 चेंडूत बाद करत ही हॅटट्रिक घेतली. त्याने या सामन्यात 2 षटकात 10 धावा देत 5 बळी घेतले आणि केरळ नाईटस संघाची अर्धी फळी कापून काढली. केरळचा संघ त्याच्या या जादुई फिरकी गोलंदाजीपुढे 10 षटकात 7 बाद 103 धावा केल्या. तांबेच्या 5 बळीमध्ये ख्रिस गेलसारख्या आक्रमक फलंदाजाचाही समावेश आहे. टी-10 लीगमधील ही पहिली हॅटट्रिक आहे.
केरळा संघाच्या वेन पारनेलने सर्वाधिक 59 धावा केल्या. 24 चेंडूत त्याने 7 चौकार आणि 4 षटकारांच्या साहाय्याने 59 धावा केल्या, तर सोहेल तन्वीरने 23 धावा केल्या. केरळा संघाने दिलेल्या 103 धावांचे आव्हान सिंधी संघाने 7.4 1 षटकात 1 गडी गमावून हे आव्हान पार केले. सलामीचा फलंदाज शेन वॉटसनने नाबाद 24 चेंडूत 50 धावा केल्या. त्यात 4 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. अँटॉन डेवचिच 49 धावा काढून बाद झाला.

No comments:
Post a Comment