Welcome to Sports Vishwa

Friday, November 23, 2018

मेरी कोमकडे सहाव्यांदा विश्‍वविजेतेपद जिंकण्याची संधी

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिग्गज बॉक्सिंग खेळाडू मेरी कोमने धडक मारली असून गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यात महिलांच्या 48 किलो वजनी गटात नॉर्थ कोरियाच्या किम ह्यांग मीला 5-0 ने पराभवाचा धक्का देत मेरीने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
आतापर्यंत कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असणार्‍या मेरीने 5 वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदके जिंकल्यामुळे सहाव्यांदा सुवर्णपदक पटकावत विश्‍वविजेतेपद जिंकून इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
भारताचे या स्पर्धेतील एक मोठे पदक या विजयामुळे निश्‍चित झाले आहे. आतापर्यंत जगभरातील विविध बॉक्सिंग स्पर्धांमध्ये मेरीने पदक पटकावली आहेत. गेल्या वर्षीच 35 वर्षीय मेरीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. त्यासोबतच गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण पदकावर तिने नाव कोरले होते.

No comments:

Post a Comment