Welcome to Sports Vishwa

Friday, November 23, 2018

दरवर्षी होणार आशिया चषकाचे आयोजन?

यंदा आशिया चषक स्पर्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादामुळे यूएईमध्ये खेळविण्यात आली. या स्पर्धेचे तेथे यशस्वी आयोजन करण्यात आले. भारताने यंदाच्या आशिया चषकावर सत्ता गाजवली. या यशस्वी नियोजनामुळे आशिया क्रिकेट परिषद ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याच्या विचारात असून लाहोर येथे झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे.
याबाबत एसीसीचे अध्यक्ष व बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हुसैन म्हणाले, की योग्य दिशेने आम्ही वाटचाल करत असून आमचा भर आशिया क्रिकेटचा विकास करण्यावर असेल. पुढे बोलताना हुसेन म्हणाले, की दरवर्षी आशिया चषक आयोजन करण्याचा प्रस्ताव चांगला आहे. यासंबंधी लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. दरवर्षी आम्ही सिनियर संघासाठी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्याच्या विचारात आहोत तसेच 19 वर्षाखालील संघासाठीही हा विचार करत असल्याचे हुसेन यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment