Welcome to Sports Vishwa

Friday, November 23, 2018

भुवनेश्‍वर, खलील अहमदचा भेदक मारा; कागारुंची दाणादाण

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली असून ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ स्वस्तात बाद केला आहे. कागांरुंच्या 11 षटकांमध्ये 5 बाद 62 धावा झाल्या आहेत.
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणार्‍या भारतीय संघाने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाला जोरदार धक्के द्यायला सुरुवात केली. भारताकडून आत्तापर्यंत भुवनेश्‍वर कुमार आणि खलील अहमदने प्रत्येकी 2 विकेटस घेतल्या तर कृणाल पांड्याने एका फलंदाजाला माघारी पाठवलं आहे.
आता ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर बाद करून मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पहिला टी-20 सामना अवघ्या 4 धावांनी गमावल्यानंतर आता हा सामना जिंकून मालिकेत पुन्हा एकदा बरोबरी करण्याकडे भारताचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. फिरकीपटू यजुवेंद्र चहलला या सामन्यात संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ॠषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, क्रूणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि खलील अहमद.
ऑस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, क्रिस लिन, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, बेन मॅक्डॉरमेट, एलेक्स कॅरी, एंड्रयू टाई, एडम जाम्पा, बेहेरनडोर्फ आणि नॅथन कूल्टर नील.

No comments:

Post a Comment