Welcome to Sports Vishwa

Friday, November 23, 2018

प्रो कबड्डी 2018: घरच्या मैदानावर गुजरातचा विजयी शेवट, हरियाणाला पहिल्यांदाच केले पराभूत

प्रो कबड्डीत झोन ’अ’ मध्ये गुजरातचा सामना हरियाणा स्टीलर्ससोबत होता. घरच्या मैदानावर खेळताना गुजरातने विजयी लय कायम राखताना हरियाणाला 40-31 ने पराभूत केले. गुजरातच्या संघाने प्रथमच हरियाणा संघाविरुद्ध विजय मिळवला आहे. विजयासह गुजरातने गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले आहे.
गुजरातने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. महेंद्र राजपूतने 3 गुण घेत गुजरातला दमदार सुरुवात करुन दिली. गुजरातने पहिल्या सत्रात हरियाणावर 21-15 अशी 6 गुणांची आघाडी घेतली होती. दुसरया सत्राच्या सुरुवातीला हरियाणाच्या पुनरागमनाचे प्रयत्न गुजरातने हाणून पाडला. गुजरातने हरियाणावर लोन चढवत आघाडी भक्कम करत आरामात विजय मिळवला. गुजरातकडून चढाईत सचिन तंवरने 10 गुण घेत चांगली कामगिरी केली. त्याला महेंद्र राजपूत आणि के. प्रपंजनने 5-5 गुण घेत साथ दिली. बचावात परवेश भैंसवालने चांगली कामगिरी कायम ठेवत 6 गुणांची कमाई केली. तर कर्णधार सुनिल कुमार 4 गुण आणि हादी ओश्तोराकने 3 गुण घेतले.
हरियाणाचा संघ सुरुवातिपासूनच पिछाडीवर पडला. दुसर्‍या सत्रात संघाचा पुनरागमनाचा प्रयत्न अपयशी ठरला. संघाकडून सामन्यात कर्णधार मोनू गोयतने चढाईत चांगली कामगिरी करताना 10 गुण घेतले. तर, विकास कंडोलाने 6 गुण घेतले. बचावात सचिन शिंगाडेने 4 गुणांची तर कुलदिप सिंगने 3 गुणांची कमाई केली. पराभवासह हरियाणाच्या प्लेऑफ मध्ये जाण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment