Welcome to Sports Vishwa

Friday, November 23, 2018

गतविजेत्या विंडीजचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

आयसीसी महिला ऊ-20 विश्‍वचषकाच्या पहिला उपांत्य सामना सर विवियन रिचर्डस स्टेडियम, एंटिग्वा येथे झाला. घरच्या मैदानावर खेळणार्‍या गतविजेत्या विंडीजचा ऑस्ट्रेलियाने 71 धावांनी दारुण पराभव करत मागील विश्‍वचषकातील पराभवाचा बदला घेतला. विजयासह ऑस्ट्रेलियाने सलग पाचवेळा ऊ-20 विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
विंडीजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा केल्या. अ‍ॅलेसा हेली 46 धावा, कर्णधार मेग लॅनिंग 31 धावा आणि राचेल हायन्स 25 धावा यांनी चांगली फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. विंडीजकडून शकेरा सलमान, स्टेफनी टेलर, हेली मॅथ्यूज, एफी फ्लेचर आणि डियांड्रा डॉटीन यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. अ‍ॅलेसा हेलीला 46 धावांच्या खेळीसाठी मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाच्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघाची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीचे फलंदाज अवघ्या 15 धावांवर बाद झाले. कर्णधार स्टेफनी टेलर 16 धावांचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. विंडीजचा संघ 17.3 षटकांत केवळ 71 धावा करुन सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून इलायस पेरी, डेलिसा किमिन्स आणि अ‍ॅे गार्डनर यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर, मेगन स्कट सोफीया, आणि जॉर्जिया वेरहॅम यांनी 1-1 बळी घेतली.

No comments:

Post a Comment