Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

प्रो कबड्डी 2018: घरच्या मैदानावर बुल्सची पराभवाने सुरुवात, बंगाल विजयी

प्रो कबड्डीत बेंगळुरु बुल्सचे घरच्या मैदानावरील सामने सुरू झाले आहेत. झोन ’ब’ मध्ये त्यांचा सामना बंगाल वारियर्ससोबत होता. पवन कुमार सेहरावतने केलेल्या चांगल्या खेळानंतरही बेंगळुरु बुल्स विजयी होवू शकली नाही. बुल्सला बंगालकडून 33-31 गुणफरकाने पराभव स्वीकारावा लागला.
सुरुवातीपासूनच सामन्यात दोन्ही संघात संघर्ष पहायला मिळाला. पहिल्या सत्राच्या शेवटी बंगालने बुल्सवर लोन चढवत 18-14 अशी 4 गुणांची आघाडी घेतली. दुसर्‍या सत्रातही बंगालने आघाडी कायम ठेवत बुल्सवरती विजय निश्‍चित केला. बंगालकडून या सामन्यात चढाईत मनिंदर सिंगने 14 गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला महेश गौडने 6 गुण घेत चांगली साथ दिली.
बुल्सकडून चढाईत पवन कुमार सेहरावतने 11 गुणांची कमाई करत सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला. कर्णधार रोहित कुमार 9 गुण आणि काशिलिंग आडकेने 5 गुण घेतले. परंतु, बचावपटूंकडून झोलेली निराशाजनक कामगिरी संघाच्या पराभवास कारणीभूत ठरली. बुल्सच्या बचावपटूंना सामन्यात केवळ 3 गुणांची कमाई करता आली.

No comments:

Post a Comment