Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

तिसर्‍या ऊ-20 साठी ऑॅस्ट्रेलिया संघात ’या’ स्पेशालिस्ट गोलंदाजाची वापसी

ऑॅस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 3 सामन्यांची ऊ-20 मालिका सुरू आहे. ऑॅस्ट्रेलिया संघाने तिसर्‍या ऊ-20 सामन्यासाठी संघात बदल करताना जखमी बिली स्टॅनलेकच्या जागी मिचेल स्टार्कची संघात निवड केली आहे. सिडनी येथे मालिकेतील शेवटचा आणि तिसरा ऊ-20 सामना होणार आहे. ऑॅस्ट्रेलिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
दुसर्‍या सामन्याच्यावेळी झेल घेण्याचा सराव करताना स्टॅनलेकच्या घोट्याला दुखापत झाली होती. दुसर्‍या ऊ-20 सामन्यात बिली स्टॅनलेकच्या जागी नथन कुल्टर नाइलला संधी देण्यात आली होती. आता संघ व्यवस्थापनाने 13 सदस्यीय संघात स्टॅनलेकच्या जागी मिचेल स्टार्कची निवड केली आहे. मालिकेतील पहिला सामना ऑॅस्ट्रेलियाने 4 धावांनी जिंकला तर, दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला.
भारताविरुद्ध होणार्‍या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मिचेल स्टार्कला 3 ऊ-20 सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. स्टार्कने शेवटचा ऊ-20 सामना 2 वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. स्टार्क सध्या शेफील्ड शील्ड स्पर्धेत न्यू साउथ वेल्स संघाकडून खेळत आहे.
ऑॅस्ट्रेलिया संघ
अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), एस्टन अगार, जेसन बेहरेनडोर्फ, अ?ॅलेक्स कारे, नथन कूल्टर नाइल, ख्रिस लिन, बेन मॅक्डरमोट, ग्लेन मॅक्सवेल, डीआर्सी शॉर्ट, मार्कस स्टोयनिस, अ‍ॅन्ड्र्यू टाय, अ?ॅडम झॅम्पा, मिचेल स्टार्क.

No comments:

Post a Comment