Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

पहिल्या टी-20 सामन्यात षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी ऑॅस्ट्रेलियन संघाला दंड


21 नोव्हेंबरला ब्रिस्बेन येथे ऑॅस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी आयसीसीने ऑॅस्ट्रेलियन संघाला दंड ठोठावला आहे. आयसीसीने ही कारवाई सामन्यात षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी केली.
आयसीसीच्या कलम 2.5.1 नुसार षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी खेळाडूंना  सामना कमाईच्या 10 टक्के तर कर्णधार अ‍ॅरोन फिंचला 20 टक्के दंड ठोठावण्यात आला. सोबतच अ‍ॅरोन फिंच संघाचा कर्णधार असताना जर पुढील 12 महिन्यात ऑॅस्ट्रेलिया संघाने षटकांची गती कमी राखल्यास फिंचवर सामना बंदीची कारवाई होवू शकते, असे आयसीसीने स्पष्ट केले.
निर्धारित वेळेत ऑॅस्ट्रेलिया संघाने 1 षटक कमी टाकले होते, त्यामुळे सामनाधिकारी जेफ क्रो यांनी ही कारवाई केली. ही कारवाई सामन्यातील प्रत्यक्ष पंच सायमन फ्राय आणि पॉल विल्सन, थर्ड अंम्पायर गेरार्ड अबूड आणि शॉन क्रेग यांच्या सहमतीनी करण्यात आली.

No comments:

Post a Comment