Welcome to Sports Vishwa

Friday, November 23, 2018

पाकिस्तानच्या ’या’ गोलंदाजाने घेतले 4 चेंडूत 4 बळी

दुबईमध्ये सुरु असलेल्या टी-10 लीगमध्ये बंगाल टायगर्स आणि नॉदर्न वारियर्य यांच्यात झालेल्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना गोलंदाजीतील उत्तम प्रदर्शन पाहायला मिळाले. बंगाल टायगर्सच्या गोलंदाजानी सलग 5 चेंडूत 5 बळी घेऊन सामन्यांत रोमांचक क्षण तयार केला. यातील पहिला बळी अली खानने घेतला तर इतर 4 बळी आमिरने घेतले. बंगाल टायगर्स आणि नॉदर्न वारियर्यला 36 धावांनी हरविले.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आमेर यामीनने टी-10 लीगमध्ये बंगाल टायगर्सकडून खेळताना पहिल्याच सामन्यात सलग 4 चेंडूत 4 गडी बाद करण्याचा पराक्रम केला. आमिरने 2 षटकात 4 धावा देत 4 गडी बाद केले. त्यात 11 डॉट चेंडू टाकले. यामीनची टी 10 लीगमधील ही सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. 2007 मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने 4 चेंडूत 4 गडी बाद केले होते. त्याचा कारनामा यामीनने करुन दिला.
या सामन्यात टायगर्स संघाने लीगमध्ये विजयी सुरुवात केली आहे. बंगाल टायगर्सने निर्धारित 10 षटकात 130 धावा केल्या. त्यात जेसन रॉयने 29 चेंडूत 60 धावांची आक्रमक खेळी केली. शेरफेने रदरफोर्डने 21 चेंडूत 47 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. विजयासाठी 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नॉदर्न वारियर्यची सुरुवात चांगली झाली. सलामीचा फलंदाज लेंडल सिमंसने 44 धावा केल्या.

No comments:

Post a Comment