Welcome to Sports Vishwa

Friday, November 23, 2018

सानिया मिर्झाचा मुलासोबत पहिला फोटो

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांना गेल्या महिन्यात मुलगा झाला. या मुलाचे नाव ’इझान मिर्झा मलिक’ ठेवण्यात आले. या बाळाचा पहिला फोटो सानियाने शेअर केला आहे. सानियाने टिवटरवर बुधवारी हा फोटो शेअर केला आहे.
12 एप्रिल 2010 रोजी सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह झाला होता. त्यानंतर 30 ऑॅक्टोबर रोजी या गोंडस मुलाने जन्म घेतला आहे. या बाळाच्या जन्मामुळे सानिया बराचकाळ आपल्या खेळापासून दूर राहिलेली आहे.
सानिया आणि शोएब यांनी मुलाचे नाव इजान मिर्झा मलिक असे ठेवल असून 31 वर्षीय टेनिस स्टारने अगोदरच सांगितले होते की, हे बाळ दोन्ही आडनाव लावणार आहे.
सानिया मिर्झाने आपला जीम गेल्याचा फोटो देखील टिवटरवर शेअर केला होता. मुलाच्या जन्मानंतर अगदी पंधरा दिवसांतच सानिया जिममध्ये गेली. मी खूप उत्साही आहे. जसे एखादं लहान मुले दुकानात जायला उत्साही असते अगदी तसेच. ही मानसिक आणि शारीरिक रूपात खूप चांगली वापसी आहे. याची शुरूवात मी माझ्या वाढदिवसादिवशीच केली आहे.
माजी डबल्स वर्ल्ड नंबर 1 सानिया मिर्झा ही ऑॅक्टोबर 2017 पासून टेनिस पासून दूर होती. सहा ग्रँड स्लॅम दुहेरी स्पर्धांचे विजेतेपद तिने मिळवले आहे. आता सानियाने 2020 च्या टोकियो ऑॅलिंपिकसाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment