Welcome to Sports Vishwa

Sunday, November 25, 2018

आज आम्ही ऑस्ट्रेलियापेक्षा चांगले होतोत - कोहली

ऑस्ट्रेलिया विरुध्द तिसर्‍या आणि निर्णयाक टि-20 सामन्यात शानदार खेळ करुन मालिका वाचविणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले की आज आम्ही ऑस्ट्र्ेलियापेक्षा चांगले होतोत.
कर्णधार विराट कोहली (नाबाद 61) आणि शिखर धवन (41) यांच्या दमदार फलंदाजलच्या जोरावर भारताने सिडनी क्रिकेट मैदानावर रविवारी खेळण्यात आलेल्या तिसर्‍या आणि आणि निर्णयाक टि-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून पराभूत करुन मालिका 1-1 ने  बरोबरीत आणली.
कोहलीने सामन्यानंतर म्हटले की ज्यावेळी दोघांनी (रोहित शर्मा आणि शिखर धवन) ने आमच्यासाठी काम सोपे केल्याने  गोष्टी खूप सोप्या झाल्या होत्या. आम्ही विचार केला होता की जुन्या चेंडूसह खेळपट्टी मंद होईल परंतु क्रिकेटमध्ये असेच होत असते.
त्याने म्हटले की आपण कधी गती गमवून बसतो आणि परत त्याला मिळवतोत. शेवटी कार्तिकने चांगली फलंदाजी केली. मॅम्सवेल आयिा जम्पा दोघांनीही उत्कृष्ट गोलंदाजी केली. एकूण पाहता क्षमतांच्या जोरावर आम्ही आज ऑस्ट्रेलिया पेक्षा चांगले होतोत.
त्यांने म्हटले की ज्यावेळी आमचे सलामीचे फलंदाज आपल्या लयमध्ये येतात त्यावेळी त्यांना थांबविणे मुश्किल होते आहे. मी तिसर्‍या क्रमांकावर  संघाला लक्ष्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी आलो होतो. मला वाटते की हे 180 चा विकेट असेल. दोनीही संघ कसे खेळले हे बरोबरीच्या मालिकेतून दिसून येते.

गांगुली मितालीला बाहेर ठेवल्याने आश्‍चर्यचकित नाही

माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीने सांगितले की महिला टी-20 विश्‍वचषकात इंग्लंडविरूद्ध उपांत्य सामन्यात  मिताली राजला समाविष्ट न करण्याच्या निर्णयाने तो आश्‍चर्यचकित नाही.
सतत दोन अर्धशतक बनऊनही मितालीला ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळलेला लीग सामना आणि नंतर इंग्लंडविरूद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्याने बाहेर बसवले गेले आणि या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
गांगुलीने येथे टॉलीगंज क्लबमध्ये सांगितले नाही. संघाचे नेतृत्व केल्यानंतर मला बाहेर बसावे लागले. जेव्हा मी मितालीला बेंचवर बसताना पाहिले तर मी सांगितले ’ग्रुपमध्ये तुमचे स्वागत आहे.’
गांगुलीने ग्रेग चॅपलच्यावेळी स्वत:चे उदाहरण देताना सांगितले कर्णधाराला बाहेर बसवण्यासाठी सांगितले जाते, तर तुम्ही असेच करावे. मी पाकिस्तान दौर्‍यावर फैसलाबादमध्ये असे केले होते.
त्यांनी सांगितले जेव्हा मी एकदिवसीय सामन्यात सर्वश्रेष्ठ लयात होतो तेव्हा मी 15 महिन्यापर्यंत एकदिवसीय सामना खेळला नव्हता. आयुष्यात असे होत असते.
त्यांनी सांगितले की मितालीसाठी हा जगााचा शेवट नाही.
माजी कर्णधाराने सांगितले तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही सर्वात चांगले आहात कारण तुम्ही काही केले आणिनंतर एक संधी आहे. यामुळे मितालीला बेंचवर बसण्यासाठी सांगितल्याने मी निराश नाही.
गांगुलीने महेंद्र सिंह धोनीविषयी विचारले गेले जे मागील काही वेळेपासून चांगल्या लयात नाही आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेल्या सध्याचा भारतीय टी-20 आणि एकदिवसीय संघ सहभाग नाही.
माजी कर्णधाराने सांगितले तो (धोनी) एक चॅम्पियन आहे. टी-20 विश्‍वचषक जिंकल्यानंतर मागील 12-13 वर्ष त्याच्यासाठी चांगले राहिले. फक्त त्यांना चांगले प्रदर्शन करायचे आहे.

महिला हॉकी : नेदरलँड सातव्यांदा चॅम्मियंस ट्रॉफीचा विजयता

नेदरलँडच्या महिला हॉकी संंघाने रविवारी ऑस्ट्र्ेलियाला एकतरफा अंतिम सामन्यात 5-1 ने पराभूत करुन सातव्यांदा ट्रॉफीचा कप जिंकल
नेदरलँडने अंतिम सामन्यात दमदार सुरुवात केली आणि शान डे वार्डने संघासाठी पहिला गोल केला. यानंतर काही मिनिटानंतर अ‍ॅवा डे गोएडेने नेदनलँडची आघाडी दुप्पट केली.
तिस-या क्वॉटर्रमध्ये ऑस्ट्र्ेलियाने वापसी करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाने पेनाल्टी कॉर्नर मिळवली आणि मॅडी फिटजपॅट्रिकने गोल करुन गोलचे अंतर कमी केले.
ऑस्ट्रेलियाच्या या गोलमुळे नेदरलँडच्या आत्मविश्‍वासावर काही विशेष परिणाम पडला नाही लॉरेन स्टॅमने तिसर्‍या क्वार्टरमध्ये गोल करुन नेदरलॅेडीा 3-1 ने आघाडी मिळवून दिली. चौथ्या र्क्वाटरमयये नेदरलँडसाठी मॅक्सिम केरस्टोल्टने चौथा आणि मारिया वेरस्कूरने पाचवा गोल केला.

मेरी कॉम महिला मुक्केबाजी चॅम्पियनशिपची सर्वश्रेष्ठ मुक्केबाज

भारताची दिग्गज महिला मुक्केबाज एम.सी.मेरी कॉमला येथे झालेल्या 10 व्या आईबा महिला विश्‍व मुक्केबाजी चॅम्पियनशिपची सर्वश्रेष्ठ मुक्केबाज म्हणून घोषीत केले गेले.
आईबा पॅनलने 35 वर्षीय मेरी कॉमला चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार्‍या स्पर्धकांमध्ये सर्वश्रेष्ठ मुक्केबाज म्हणून निवडले. मेरी कॉमने शनिवारी चॅम्पियनशिपमध्ये सहाव्यांदा विश्‍व चॅम्पियनशिपचा कप जिंकून इतिहास रचला. तिने 2006 मध्ये येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता.
मेरी कॉमने रविवारी पत्रकार परिषदेत म्हटले की यावर्षी काही देशाच्या मुक्केबाजानी यामध्ये भाग घेतला. याला अजूनही ऑलम्पिकमध्ये सामिल केले गेले नाही. तरीही आम्ही आता पर्यंत चार सुवर्णसह आठ पदक जिंकले आहे. यावेळी येथे आमचे प्रदर्शन खूप चांगले राहिले. यामध्ये आम्ही एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत. 2006 पेक्षा या वर्षी या स्पर्धेचे आयोजन खूप चांगले राहिले.
हे पदक मागील पदकापेक्षा किती वेगळे आहे असा प्रश्‍न विचारला असता मेरीने म्हटले की हे माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण येथे मी आपल्या घरगुती दर्शका समोर होते आणि वेगळ्याच किलोग्रॅममध्ये होते. मी मागील पदक 2010 मध्ये जिंकले होते. मी आपल्या घरगुती दर्शका समोर सतत दबावामध्ये होते.

जिबरान खान इक्वेस्ट्रियन प्रीमियर लीग-2018 चा विजयता

एम्बेसी इंटरनॅशनल राइडिंग स्कूल (ईआयआरएस) चा जिबरान खानने येथे रविवारी झालेल्या इक्वेस्ट्रियन प्रीमियर लीग (ईपीएल) च्या नवव्या संस्करणाचा कप जिंकला.
ही स्पर्धा तीन वर्गामध्ये होती. बालक (80 सेंटीमीटर), ज्युनियर 100 सेंटीमीटर आणि ओपन 120 सेंटीमीटर. जिबरानने आपेन वर्गामध्ये आपला कप जिंकला.
बालक वर्गात शशांक वर्मा (ईआयआरए) आणि ज्युनिअर वर्गात तियाशा वाथुल (सीईओ) ने विजय मिळविला. स्पर्धेतील अंतिम सामन्यात फवाद मिर्झा, आशीष मलिक, जितेंद्र सिंह आणि राकेश कुमार सारख्या शीर्ष भारतीय घोडस्वारांसह प्रशिक्षक रोडोल्फ स्केरेरही उपस्थित होता.
जकार्तामध्ये झालेल्या आशियाई खेळात दोन रौप्य पदक जिंकणारा भारतीय इक्वेस्ट्रियन टिम आणि प्रशिक्षकाला सन्मानीत केले गेले. यावेळी मिर्झाने म्हटले की ईपीएलने एक घोडस्वारीच्या रुपामध्ये माझ्या क्षमतांना प्रकाशात आणले आहे.यामुळे माझे कौशल अधिक चांगले झाले आहे आणि माझ्यामध्ये आत्मविश्‍वास आला. ज्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खूप फायदा मिळाला.

बॅडमिंटन- समीरने दुसर्‍यांदा सैयद मोदी चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावले

सध्याचा चॅम्पियन भारताचे मुख्य पुरुष बॅडमिंटन खेळाडू समीर वर्माने आज (रविवार) येथे चांगले प्रदर्शन करून सतत दूसर्‍यांदा सैयद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले.
समीरने गतवर्षी बी साई प्रणीतला हरऊन हे विजेतेपद जिंकले होते आणि आता त्याने यावर्षी हे विजेतेपद कायक ठेवले आहे.
तीसरी सीड समीरने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामनत सहावी चीनच्या लु गुआंग्झुला तीन फेरीपर्यंत चाललेल्या कठोर आणि संघर्षपूर्ण सामन्यात 16-21, 21-19, 21-14 ने मात देऊन विजेतेपद जिंकले.
 समीरने एक तास 10 मिनीटात हा सामना जिंकला.  वर्ल्ड नंबर-16 समीरचा वर्ल्ड नंबर-36 गुआंग्झुविरूद्ध हा पहिला विजय आहे.
या विजयासह त्याने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गुआंग्झुकडून मिळालेल्या पराभवाचा बदला चुकता केला. त्याने आता गुआंग्झुविरूद्ध आपले करियर रिकॉर्ड 1-1 चे केले.
समीर पहिल्या फेरीत थोडे नरम दिसली आणि तो पहिली फेरी 16-21 ने पराभूत झाला. यानंतर त्याने दुसर्‍या फेरीत जोरदार पुनरागमन केले आणि 14-11 ची आघाडी बनल्यानंतर त्याने 21-19 ने फेरी जिंकली.
तीसरा आणि निर्णायक फेरीत दोन्ही खेळाडू चांगल्या लयात दिसला. समीर या फेरीत एकेकाळी 7-3 ने आघाडीवर होते. यानंतर चीनच्या खेळाडुने 7-7 ची बरोबरी प्राप्त केल्यानंतर 10-7 ची आघाडी बनवली.
नंतर समीरने पुनरागन केले आणि अगोदर तर 10-10 ची बरोबरी प्राप्त केली आणि त्याने 16-12 ची चांगली आघाडी बनवली. चीनची खेळाडू यानंतर फेरीत मागे असताना आणि समीरने 19-14 ची आघाडी बनवल्यानंतर 21-14 ने फेरी आणि सामना जिंकला.

दुबई कसोटी- पाकिस्तानने 5 बाद 418 धावा बनऊन डाव घोषित

हेरिस सोहेल (147) आणि बाबर आजमच्या (नाबाद 127) शतकाच्या मदतीने पाकिस्तानने येथे दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरूद्ध खेळले जाणार्‍या दुसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी आज (रविवार) पाच गडी बाद 418 धावा बनऊन आपला पहिला डाव घोषित केला.
न्यूझीलंडने याच्या उत्तरात दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत विना एखादे नुकसानीचे 24 धावा बनवल्या. तो सध्या पाकिस्तानच्या स्कोरने 394 धावांनी मागे आहे जेव्हा की त्याचे पूर्ण 10 गडी बाकी आहेत.
स्टंप्सच्यावेळी विजय रावल 31 चेंडूत तीन चौकारच्या मदतीने 17 धावा आणि टॉम लाथम 23 चेंडूवर एक चौकारच्या आधारे पाच धावा बनऊन नाबाद परतले.
यापूर्वी पाकिस्तानने आपला कालचा स्कोर चार गडी बाद 221 धावांनी पुढे खेळणे सुरू केले. सोहेलने 81 आणि बाबर आजमने आपल्या डावाला 14 धावांनी पुढे वाढवले.
सोहेल आणि आजमने सांभाळून खेळताना आपापले शतक पूर्ण केले. सोहेलचे हे दुसरे जेव्हा की आजमचे हे पहिले शतक आहे. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या गडीसाठी 186 धावा जोडल्या.
पाकिस्तानने आपला पाचवा गडी 360 च्या स्कोरवर सोहेलच्या रूपात गमावले. त्याने 421 चेंडुच्या मॅरेथॉन खेळीत 13 चौकार मारले.
आजमने कर्णधार सरफराज अहमद (नाबाद 30) सोबत सहाव्या गडीसाठी 58 धावांची भागीदारी केली. आजमने 263 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकार मारले. सरफराजने 45 चेंडुत तीन चौकार लावले.
त्याच्या व्यतिरिक्त अजहर अलीने 81, असद शफीकने 12 आणि इमाल उल हक तसेच मोहम्मद हफीजने नऊ-नऊ धावा बनवल्या.
न्यूझीलंडकडून कोलिन डी ग्रँडहोमला दोन आणि पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करून सामना जिंकणारा एजाज पटेल आणि ट्रेंट बोल्टने एक-एक गडी बाद केला.