Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

रणजी ट्रॉफी- दिल्ली-हैद्राबादचा सामना ड्रा

हैद्राबाद, 23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
येथील राजीव गांधी अतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये दिल्ली आणि यजमान हैद्राबादमध्ये खेळलेला रणजी ट्रॉफीचे ग्रुप-बी चा सामना आज (शुक्रवार) ड्रॉ वर समाप्त झाला.
सामन्याच्या चौथ्या आणि अंतिम दिवसाचा शेवट हैद्राबादने आपल्या दुसर्‍या डावात एक गडी गमाऊन 156 धावांसोबत केला.
हैद्राबादने आपल्या पहिल्या डावात 460 धावा बनवल्या होत्या आणि दिल्लीला सामन्याच्या अंतिम दिवशी पहिल्या डावात 339 धावांवर संपुष्टात आणले होते. तीन दिवसाच्या खेळाने अंदाज लावला होता की सामना ड्रॉ वर समाप्त होईल आणि झालेही असेच.
दिल्लीने चौथ्या दिवसाची सुरूवात सहा गडी गमाऊन 245 धावांसोबत केली होती. त्याने 31.1 षटकात आपल्या खात्यात 94 धावांची वाढ आणखी केली.
आपला दुसरा डाव खेळण्यासाठी उतरलेल्या यजमान संघाने तन्मय अग्रवालच्या रूपात आपला एकमात्र गडी गमावला. तन्मयने 111 चेंडुचा सामना करून नऊ चौकारच्या मदतीने 82 धावा बनवल्या. रोहित रायडूने 128 चेंडुत पाच चौकार आणि एक षटकारच्या मदतीने 61 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्यासोबत के. सुमंथ आठ धावा बनऊन नाबाद राहिले.
इंदोरचे होल्कर स्टेडियममध्ये खेळलेला पंजाब आणि मध्यप्रदेशचा सामनाही अनिर्णयीत राहिला. मध्यप्रदेशने सामन्याच्या अंतिम दिवसाचा शेवट एक गडी गमाऊन 67 धावांसोबत केला.
पंजाबने दिवसाची सुरूवात एक गडी गमाऊन 127 धावादंसोबत केली होती. त्याने आपला दुसरा डाव नऊ गडी गमाऊन 265 धावांवर घोषित केला. पंजाबसाठी दुसर्‍या डावात अभिषेक शर्माने 78, कर्णधार मनदीप सिंहने 65 धावा बनवल्या. मध्यप्रदेशसाठी वेगवान गोलंदाज ईश्‍वर पांडेने चार, आवेश खानने तीन आणि कुलदीप सेनने दोन गडी बाद केले.
दुसर्‍या डावात मध्यप्रदेशला 244 धावांचे ध्येय मिळाले. त्याने आपला पहिला गडी आर्यमन बिडलाच्या  रूपात गमावले जो पहिल्या चेंडूवर बाद झाला. येथून मोहनीश मिश्रा 34 आणि रजत पाटीदार 25 धावांवर नाबाद राहून सामना वाचवला.

No comments:

Post a Comment