Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

मिताली राजच्या मॅनेजरचा आरोप हरमनप्रीतवर धक्कादायक आरोप

मिताली राजला संघातून महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्या दरम्यान वगळण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला होता. आता या निर्णयावरुन वाद निर्माण झाला असून अत्यंत कठोर शब्दात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ताने टीका केली आहे. भारतीय महिला संघाचे टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील आव्हान इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे संपुष्टात आले.
मिताली राजसारख्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूला बाहेर बसवण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले. मितालीला संघाबाहेर बसवण्याच्या निर्णयावर संतप्त झालेल्या अनिशाने हरमनप्रीतवर गंभीर आरोप केले आहेत. हरमनप्रीत कारस्थानी, खोट बोलणारी, अपरिपक्व आणि कर्णधारपदासाठी योग्य नसलेली व्यक्ती आहे अशा शब्दात टि्वटरवरुन तिने आपला राग व्यक्त केला.
तिने हे टिवट ज्या अकाऊंटवरुन केले होते ते अकाऊंट काही वेळाने टिवटरवरुन डिलिट करण्यात आले. पण ते टिवट आपणच केल्याचे तिने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले. आता सामन्यांचे थेट प्रक्षेपण होते. त्यामुळे कोण प्रदर्शन करतो आणि कोण नाही करत ते आपल्याला दिसेलच असे तिने सांगितले.
मितालीला सातत्यपूर्ण चांगले प्रदर्शन करुनही काय वागणूक मिळाली ते आपण पाहिले. जी वागणूक तिला मिळाली ती चुकीची होती. युवा क्रिकेटपटूंना संधी द्यायची म्हणून इंग्लंड सारख्या संघाविरुद्ध उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात संघातील सर्वात अनुभवी, वरिष्ठ खेळाडूला वगळू नका असे अनिशाने म्हटले आहे. सामन्यानंतर हरमनप्रीतने मितालीला संघातून वगळण्याच्या निर्णयाबद्दल आपल्याला अजिबात खंत वाटत नसल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment