Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

बॅडमिंटन : अश्‍विनी -सात्विक जोडी सय्यद मोदी चॅम्पियनशिपच्या उपात्यातमध्ये

लखनऊ,23नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
खेळाचे चांगले प्रदर्शन आणि ताळमेळा ठेवत भारतीय जोडी अश्‍विनी पोनप्पा आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डीने येथे सुरु असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपात्य सामन्यात प्रवेश केला आहे.
मिश्रीत युगल वर्गातील उपात्यपूर्व सामन्यात शुक्रवारी अश्‍विनी व सात्विकच्या जोडीने इंडोनेशियाच्या रोनाल्ड व अ‍ॅनिसा सुफिका जोेडीला 20-22, 21-17, 21-11 अशा सेटने पराभूत करुन उपात्य सामन्यात प्रवेश केला. उपात्य सामन्यात त्यांचा सामना चीनच्या ओयु शुआनयी व फेंग शुएयिंग जोडीशी होईल.
या वर्गामध्ये मात्र बी.सुमित रेड्डी आणि पूजा दांड जोडीला इंडोनेशियाच्या रिनोव रिवाल्डी आणि पिथा मेंतारी जोडीने 51 मिनिट चालेल्या सामन्यात 21-18, 16-21, 21-19 ने पराभूत केले.

No comments:

Post a Comment