Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

चटगाव कसोटी- दुसर्‍या डावात बांग्लादेश अडचणीत

चटगाव, 23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
वेस्टइंडीजचा गोलंदाज रोस्टन चेज आणि जॅमी वारिकेनने दोन-दोन गडी बाद करून येथे जहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सुरू पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी आज (शुक्रवार) यजमान बांग्लादेशला दुसर्‍या डावात कठीण स्थितीत टाकले.
दुसर्‍या दिवशी आज (शुक्रवार) खेळ समाप्त होईपर्यंत वेस्टइंडीजने 55 धावांवर बांग्लादेशचे पाच गडी बाद केले. तसेच बांग्लादेशकडे सध्या वेस्टइंडीजवर 133 धावांची आघाडी आहे.
बांग्लादेशने आपल्या पहिल्या डावात 324 धावा बनवल्या होत्या आणि वेस्टइंडीजला पहिल्या डावात 246 धावांवर ढेर केले होते. ते आपल्या दुसर्‍या डावात 78 धावांच्या आघाडीसह उतरले होते.
दुसर्‍या दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत मुश्फीकुर रहीम 11 धावा बनऊन खेळत होते जेव्हा की नऊ चेंडू खेळलेल्या मेहंदी हसन मिराजने आतापर्यंत खाते उघडले नाही.
दुसरा डाव खेळण्यासाठी उतरलेल्या यजमान संघाला  13 च्या एकुण स्कोरवर दोन झटके लागले. वारिकेनने अगोदर इमरूल कायेस (2) आणि नंतर चेजने सौम्य सरकार (11) ला बाद केले. पहिल्या डावात शतक मारणारा मोमीनुल हक (12) 32 चे एकुण स्कोरवर चेजला दुसरा शिकार बनला. तीन धावानंतर वारिकेनने कर्णधार शाकिब अल हसन (1) ला तंबुत पाठवले.
मोहम्मद मिथुन (17) ला देवेंद्र बिशूने 53 चे एकुण स्कोरवर आपला पहिला शिकार बनवला.
यापूर्वी बांग्लादेशने दुसर्‍या दिवसाची सुरूवात पहिल्या डावात आठ गडी गमाऊन 315 धावांसह केली होती. नऊ धावा जोडून संघ तंबुत परतला.
आपला पहिला डाव खेळण्यासाठी उतरलेला विंडीज नईम हसनसमोर टिकु शकला नाही. नईमने पाच गडी बाद करून यजमान संघाला बांग्लादेशच्या स्कोरच्याजवळ जाऊ दिले नाही. नईमच्या व्यतिरिक्त शकिबने तीन गडी बाद केले.
विंडीजसाठी शिमरन हेटमायेरने 63 धावा बनवल्या. त्याने आपल्या खेळीत फक्त 47 चेंडु खेळले आणि पाच चौकारच्या व्यतिरिक्त चार षटकार मारले. शेन डॉवरिच 101 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारून 63 धावांवर नाबाद राहिले.
या दोघांच्या व्यतिरिक्त रोस्टन चेज 31 धावा बनऊ शकला. बाकि दुसरा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकण्याचे धाडस दाखऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment