Welcome to Sports Vishwa

Saturday, November 24, 2018

बॅडमिंटन : सैयद मोदी चॅम्पियनशिपमधून प्रणीत, उत्तेजिता बाहेर

लखनऊ, 23 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
बॅडमिंटनपटू बी. साई प्रणीत आणि साई उत्तेजिता राव यांच्यासाठी सैयद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारचा दिवस निराशाजनक राहिला.
प्रणीत आणि उत्तेजिता यांना त्यांच्या गटांमध्ये खेळल्या कॉर्टर फायनल सामन्यांमध्ये पराभू होवून बाहेर व्हावे लागले.
पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रणीतला चीनच्या लु ग्वांगझुने 58 मिनीटांपर्यंत चाललेल्या सामन्यात 10-21, 21-19, 14-21 ने पराभूत करुन बाहेरचा रस्ता दाखवला.
महिला एकेरी गटाच्या क्वार्टर फाइनलमध्ये उत्तेजितालाही चीनच्याच खेळाडूकडून पराभव पत्कारावा लागला. तिला ली जुरेईने 46 मिनीटांपर्यंत चाललेल्या सामन्यात 9-21, 21-19, 12-21 ने पराभूत केले आणि स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

No comments:

Post a Comment